esakal | ही घटना 360 वर्षांत प्रथमच घडणार!
sakal

बोलून बातमी शोधा

compass

360 वर्षांनंतर प्रथमच होकायंत्राची सुई वास्तविक उत्तर दिशेवर स्थिर होणार आहे. या महिन्यात ग्रीनीच येथे हा योग जुळून येणार आहे. 

ही घटना 360 वर्षांत प्रथमच घडणार!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

ग्रीनीच : दिशादर्शक म्हणून वापरला जाणारा होकायंत्र आपल्या सर्वांना माहिती आहे. जहाज, विमानांमध्ये होकायंत्राचा वापर केला जातो. भौतिकशास्त्राच्या प्रात्यक्षिकामध्ये आपण सर्वांनीच होकायंत्र अभ्यासला असेलच. त्यातील सुई नेहमीच उत्तर दिशा दर्शवते; मात्र ती कधीही स्थिर नसते. "वास्तविक उत्तर दिशा' आणि "चुंबकीय उत्तर दिशा' यामध्ये ती फिरत असते; परंतु 360 वर्षांनंतर प्रथमच होकायंत्राची सुई वास्तविक उत्तर दिशेवर स्थिर होणार आहे. या महिन्यात ग्रीनीच येथे हा योग जुळून येणार आहे. 

युरोपात गेल्या काही शतकामध्ये होकायंत्रातील वास्तविक उत्तर दिशा आणि चुंबकीय उत्तर दिशा यांच्यातील कोन उण्याहून कमी आहे. त्याचा परिणाम म्हणून सर्व होकायंत्राच्या सुया वास्तविक उत्तर दिशेच्या पश्‍चिमेकडे कललेल्या असतात. त्यामुळे ही घटना अनेकांच्या आयुष्यात एकदाच अनुभवता येणार आहे. 

याबाबत तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, "लाईन ऑफ झिरो डिक्‍लेशन' म्हणजेच दिशेतील उणे कोन असलेली रेषा ही कोनविरहीत रेषा म्हणून ओळखली जाते. ती प्रतिवर्ष 20 किमी वेगाने पश्‍चिमेकडे कलत असते. येत्या काही आठवड्यांत ती वास्तविक उत्तर दिशेवर येणार असून पुढे ती पूर्वेकडे कलत जाणार आहे. युरोपातील ग्रीनीच येथे होकायंत्राची सुई वास्तविक उत्तर दिशेवर आलेली दिसणार आहे. 

"दि रॉयल ऑब्सर्व्हेटरी ग्रीनीच' ही संस्था या लाईन ऑफ झिरो डिक्‍लेशनचा 1840 पासून अभ्यास करत आहे. या संस्थेतील संशोधक डॉ. सेरन बेगान यांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्यात ग्रीनीच येथे लाईन ऑफ झिरो डिक्‍लेशन शून्य रेखांशावर येत आहे. संस्थेच्या स्थापनेपासून ही घटना आम्ही प्रथमच अनुभवत आहोत. या रेषेला युरोपातील प्रवास पूर्ण करण्यासाठी 15 ते 20 वर्षांचा कालावधी लागणार आहे आणि 2040 पर्यंत होकायंत्रातील सुया पूर्वेकडे कललेल्या असतील; मात्र याचा सर्वसामान्यांच्या आयुष्यावर कोणताही परिणाम होत नसल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. 


 

loading image
go to top