ट्रम्प पुत्राचीही होणार चौकशी 

पीटीआय
शुक्रवार, 10 मे 2019

अध्यक्षीय निवडणुकीतील रशियाच्या हस्तक्षेपाच्या आरोपाप्रकरणी सिनेट समितीने आज अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पुत्र डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांनाच चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले.

वॉशिंग्टन : अध्यक्षीय निवडणुकीतील रशियाच्या हस्तक्षेपाच्या आरोपाप्रकरणी सिनेट समितीने आज अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पुत्र डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांनाच चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले.

रिपब्लिकन पक्षाच्या एका खासदाराने रशिया प्रकरणातील चौकशी बंद केल्याचे काल (ता. 8) जाहीर केल्यानंतर विरोधकांनी गोंधळ घातला आणि महत्त्वाची कागदपत्रे न सादर केल्याबद्दल देशाच्या ऍटर्नी जनरल यांनाच जबाबदार धरले. त्यानंतर आज अध्यक्षांच्या पुत्रालाच चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देत त्यांनी सरकारला धक्का दिला आहे. 

Web Title: will inquiry of Junior Trump