शिकागोत कडाक्याच्या थंडीची लाट; तापमान उणे १५ अंश

वृत्तसंस्था
रविवार, 27 जानेवारी 2019

शिकागोमधील बहुतांश भागात रविवारी रात्रीपासून येत्या गुरुवारपर्यंत जोरदार बर्फवृष्टी होईल, असाही वेधशाळेचा अंदाज आहे. तीन ते पाच इंच इतकी बर्फवृष्टी येत्या दोन-तीन दिवसांमध्ये होईल. यामुळे शहरातील तापमानाचा पारा आणखी खाली उतरणार आहे.

शिकागो : शिकागोमधील कडाक्याच्या थंडीची लाट अजूनही कायम आहे. स्थानिक प्रमाणवेळेनुसार, रविवारी मध्यरात्री शिकागोमधील तापमान उणे १५ अंश इतके होते. येत्या आठवड्यात ही थंडीची लाट वाढणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

शिकागोमधील बहुतांश भागात रविवारी रात्रीपासून येत्या गुरुवारपर्यंत जोरदार बर्फवृष्टी होईल, असाही वेधशाळेचा अंदाज आहे. तीन ते पाच इंच इतकी बर्फवृष्टी येत्या दोन-तीन दिवसांमध्ये होईल. यामुळे शहरातील तापमानाचा पारा आणखी खाली उतरणार आहे.

यापूर्वी २० जानेवारी, १९८५ रोजी शिकागोचे तापमान उणे ३२ अंश सेल्सियस इतके नोंदविले गेले होते. सध्याच्या शीतलहरीची तीव्रता पाहता यंदा पुन्हा एकदा तापमान या नीचांकाच्या जवळपास जाऊ शकेल. गेल्या वर्षी १६ जानेवारी रोजी शिकागोमधील तापमान उणे २७ अंश सेल्सियस इतके होते.

कमी तापमान आणि बर्फवृष्टीमुळे शहरातील वाहतुकीसाठी सावधगिरीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या बुधवारी (३० जानेवारी) शिकागोमध्ये सर्वांत नीचांकी तापमानाची नोंद होण्याची शक्यता आहे. एका अंदाजानुसार, शिकागोमध्ये बुधवारी उणे ५० अंश सेल्सियसपर्यंत तापमानाचा पारा खाली उतरेल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Winter continues to grip the Chicago cold wave continues