ब्रिटनमध्ये लवकरच ‘हिवाळी लॉकडाउन’ शक्य 

पीटीआय
Monday, 23 November 2020

ब्रिटनमध्ये सध्या लॉकडाउन सुरु असून तो २ डिसेंबरला संपत आहे. मात्र, यामुळे फारसा फरक न पडल्याने आणि थंडीचा काळ लक्षात घेता सध्याचे नियम अधिक कडक केले जाण्याची चिन्हे आहेत. 

लंडन - युरोपात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वेगाने वाढत असल्याने ब्रिटनमध्ये आणखी कडक नियमावली लागू करण्याचा विचार सरकार करत आहे. ब्रिटनमध्ये सध्या लॉकडाउन सुरु असून तो २ डिसेंबरला संपत आहे. मात्र, यामुळे फारसा फरक न पडल्याने आणि थंडीचा काळ लक्षात घेता सध्याचे नियम अधिक कडक केले जाण्याची चिन्हे आहेत. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी या महिन्याच्या सुरुवातीला ‘स्टे ॲट होम’ लॉकडाउन जाहीर केला होता. यामध्ये प्रत्येक भागातील संसर्गाच्या परिस्थितीनुसार नियम लागू करण्यात आले होते. मात्र, हे नियम फारसे प्रभावी ठरले नसल्याचा तज्ज्ञांचा अहवाल आहे. त्यामुळे जॉन्सन लवकरच ‘हिवाळी योजना’ जाहीर करत नियम अधिक कडक करतील, अशी आशा आहे. हे नवे नियम नाताळपर्यंत लागू असण्याची शक्यता आहे. मात्र, यासाठी त्यांना स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंडचे सहकार्य मिळणे आवश्‍यक आहे. ‘सध्याच्या लॉकडाउनमध्ये प्रत्येकाच्या सहकार्यामुळे आपण संसर्गावर थोडेफार नियंत्रण मिळवू शकलो आहोत. मात्र, अद्यापही विषाणूचा प्रभाव कायम असल्याने योग्य उपाय योजले नाही तर परिस्थिती कधीही नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. त्याचा परिणाम देशाच्या विकासावर होऊ शकतो आणि पुन्हा एकदा काही महिन्यांपूर्वीची परिस्थिती निर्माण होऊ शकते,’ असे सरकारच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Winter lockdown possible in Britain soon