सेक्ससाठी घरी बोलवले अन् दरवाजाच उघडला नाही...

वृत्तसंस्था
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

प्रियकराने पहाटे चारच्या सुमारास फोन करून सेक्स करण्यासाठी घरी बोलवले. प्रचंड आनंद झालेली प्रेयसी त्याच्या घरी तत्काळ गेली. पण...

न्यूयॉर्क: प्रियकराने पहाटे चारच्या सुमारास फोन करून सेक्स करण्यासाठी घरी बोलवले. प्रचंड आनंद झालेली प्रेयसी त्याच्या घरी तत्काळ गेली. प्रियकराला झोप लागल्याने त्याने दरवाजा उघडला नाही. यामुळे चिडलेल्या प्रेयसीने प्रियकराचे घरच पेटवून दिले.

अमेरिकेमधील न्यू जर्सीमध्ये 4 ऑगस्ट रोजी ही घटना घडली असून, पोलिसांनी रुसेल (वय 29) या प्रेयसीला अटक केली आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, रुसेल हिच्या प्रियकराने तिला पहाटे चार वाजता फोन करून सेक्स करण्यासाठी घरी बोलवले होते. रुसेल आनंद होऊन तत्काळ प्रियकराच्या घरी पोहचली. मात्र, प्रियकराला झोप लागल्यामुळे त्याने घर उघडले नाही. यामुळे चिडलेल्या रुसेल हिने जवळच्या पेट्रोल पंपावरुन पेट्रोल आणले व प्रियकराच्या घरावर टाकत आग लावली व घटनास्थळावरून पळ काढला. काही वेळातच ज्वाळांनी घराला वेढले त्यामुळे प्रियकराला जाग आली. झोपेतून उठल्यानंतर घराचा पुढचा भाग आगीच्या भक्षस्थानी पडल्याचे त्याला दिसले. दरवाजालाच आग लावण्यात आल्याने त्याने खिडकीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. घराच्या खिडकीच्या काचा फोडून तो अर्धनग्नअवस्थेत घराबाहेर पडला व पोलिसांकडे धाव घेतली व आगीबद्दल माहिती दिली. पोलिसांनी या घटनेबाबत अग्निशामन दलाला माहिती दिली. अग्निशामक दलाने आग तत्काळ आटोक्यात आणली. पोलिसांनी युवकाला जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून, त्याला श्वसनाचा त्रास होत आहे. शिवाय, काही ठिकाणी भाजले आहे.

दरम्यान, पोलिसांनी युवकाकडे चौकशी केली असता त्याने संपूर्ण घटनाक्रम सांगताना प्रेयसीला सेक्ससाठी घरी बोलावल्याचे सांगितले. शिवाय, अनेक दिवसांपासून शारिरीक संबंध असल्याची माहिती त्याने दिली. पोलिसांनी घराबाहेरील सीसीटीव्हीमधील फुटेज तपासले असता प्रेयसीनेच घराला आग लावल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी रुसेलला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी तिच्यावर खुनाचा प्रयत्न, जाळपोळ करणे, एखाद्याचा जीव धोक्यात घालणे आणि गुन्हेगारी कृत्याने एखाद्याचा छळ करण्याच्या गुन्ह्यांखाली अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman burns down lovers house after he calls for sex but fell asleep