Video: ती एकामागून एक पॅंट काढतच गेली अन् शेवटी...

वृत्तसंस्था
Monday, 25 November 2019

सोशल मीडियावर एका युवतीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये युवतीने एकावर एक अशा नऊ जीन्स पॅंट घातल्या आहेत. जीन्स पॅंटची चोरी करण्यासाठी तिने हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे.

न्यूयॉर्क: सोशल मीडियावर एका युवतीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये युवतीने एकावर एक अशा नऊ जीन्स पॅंट घातल्या आहेत. जीन्स पॅंटची चोरी करण्यासाठी तिने हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे.

एकावर एक किती जीन्स पँट घालता येतात हे युवतीने दाखवून दिले आहे. संबंधित व्हिडीओ व्हेनेझुएला येथील आहे. युवतीने एका दुकानामध्ये जीन्स पँटची चोरी केली. एकावर एक अशा नऊ पँट घालून ती निघाली होती. परंतु, तिची चोरी सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आली. सुरक्षा रक्षकाने तिला जीन्स पँट काढायला लावल्या. व्हिडिओमध्ये सुरक्षा रक्षक मोजत असताना आवाज येत आहे. विशेष म्हणजे तिने फक्त काळया आणि निळ्या रंगाच्याच जीन्स पँटची चोरी केली आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. नेटिझन्सनी तिच्या कलेचे कौतुक केले आहे तर एका युवतीने एक जीन्स पॅँट घालताना किती कसरत करावी लागते, तिने तर तब्बल नऊ पँट घातल्या आहेत. तिने जादूगार म्हणून सर्कशीमध्ये काम करायला हवे, अशी प्रतिक्रिया नेटिझन्सनी दिल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman caught shoplifting 8 pairs of jeans by wearing them all at once video viral