युवती म्हणते, माझ्या होणाऱया बाळाचे चार बाबा...

वृत्तसंस्था
बुधवार, 11 डिसेंबर 2019

माझे चार मित्र असून, चौघांसोबत एकाच घरात राहते. मी गर्भवती असल्याचे समजल्यानंतर मैत्रिणींना धक्का बसला. पण, माझ्या होणाऱया बाळाचे चौघेही बाबा आहेत, असा खुलासा युवतीने केला आहे.

वॉशिंग्टनः माझे चार मित्र असून, चौघांसोबत एकाच घरात राहते. मी गर्भवती असल्याचे समजल्यानंतर मैत्रिणींना धक्का बसला. पण, माझ्या होणाऱया बाळाचे चौघेही बाबा आहेत, असा खुलासा युवतीने केला आहे.

अमेरिकेतील फ्लोरिडा येथे राहणारी टोरी ओजेडा (वय 20) ही गर्भवती आहे. मैत्रिणींनी तिला बाळाचे बाबा कोण आहेत, असे विचारल्यानंतर तिने माझे चारही मित्र होणाऱया बाळाचे बाबा आहेत, असे उत्तर दिले.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, टोरी ही आपल्या मित्रांसोबत जॅकसोनव्हिले येथे राहते. मार्क (वय 18), ट्रॅव्हिस (वय 23), इथान (वय 22) व ख्रिस्टॉपर (वय 22) हे टोरीचे मित्र असून, चौघांसोबत प्रेमसंबंध आहेत. चौघेही एकाच घरामध्ये लिव्ह इन रिलेशेनशिपमध्ये राहतात. टोरी सध्या गर्भवती असून, खून आनंदात आहे. टोरीला तिच्या मैत्रिणीनी होणाऱया बाळाच्या बाबांबद्दल विचारले असता तिने माझ्या बाळाचे चौघेही बाबा असल्याचे उत्तर दिले. चौघेही बाळाचा सांभाळ करणार असले तरी ख्रिस्टॉपर हा जैविक बाबा असल्याचे तिने म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman living with four boyfriends got pregnant and says four are father of this child