महिलेने नऊ मिनिटात दिला 6 बाळांना जन्म!

वृत्तसंस्था
सोमवार, 18 मार्च 2019

जगभरात 4.7 अब्ज गर्भवती महिला एकाच वेळी बाळांना जन्म देतात. परंतु, त्यात एखादीच महिला अशी असते जी सहा मुलांना एकाच वेळी जन्म देऊ शकते, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

टेक्सासः टेक्सासमधील ह्यूस्टनमध्ये राहणाऱ्या एका महिनेने नऊ मिनिटांमध्ये एकाच वेळी सहा बाळांना जन्म दिला आहे. बाळंतीन व तिच्या सहा बाळांची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

थेलमा चैका असे बाळंतीन झालेल्या महिलेचे नाव आहे. 15 मार्च रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी 4.50 ते 4.59 या वेळेमध्ये बाळांचा जन्म झाला आहे. सहा बाळांमध्ये चार मुले व दोन मुलींचा समावेश आहे. सहा बाळांची प्रकृती उत्तम असली तरी त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. झैद हैदर व त्यांच्या पथकाने दिली.

एकाच वेळी सहा मुलांना जन्म देण्याची ही दुर्मिळ घटना आहे. 1968 मध्ये बिरमिंगहम येथे एका महिलेने सहा मुलांना जन्म दिला होता. त्यावेळी 28 डॉक्टरांनी महिलेची प्रसुती केली होती. शिवाय, ह्यूस्टनमध्ये एका गरोदर महिलेने एकाचवेळी चार मुलांना जन्म दिला होता.

जगभरात 4.7 अब्ज गर्भवती महिला एकाच वेळी बाळांना जन्म देतात. परंतु, त्यात एखादीच महिला अशी असते जी सहा मुलांना एकाच वेळी जन्म देऊ शकते, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. आपल्या दोन मुलांची नावे जीना आणि जुरियल अशी ठेवली असून, इतर चार मुलांच्या नावांचा विचार करत आहे, असे थेलमा यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman in Texas gives birth to sextuplets in under 9 minutes

टॅग्स