घरात 2 वर्षे सडत होता भाडेकरूचा मृतदेह; घरमालकाला मात्र भाडे जात होते वेळेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Door

घरात 2 वर्षे सडत होता भाडेकरूचा मृतदेह; घरमालकाला मात्र भाडे जात होते वेळेत

लंडन : लंडनमधील पेकहॅम येथील एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये एक महिला तब्बल दोन वर्षापासून मृत्यू झालेल्या अवस्थेत आढळली आहे. ऑगस्ट २०१९ पासून तिचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. विशेष म्हणजे तिच्या मृत्यूनंतरही घरमालकाला तिच्याकडून भाडे पोहोचत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शीला सेलिओने असं मृत्यू झालेल्या ६१ वर्षीय महिलेचं नाव असून पोलिसांनी तिच्या मृत शरीराचा सापळा बाहेर काढला आहे.

मृत महिलेच्या दातांच्या रचनेवरून तिची ओळख पटवण्यास मदत झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या महिलेचं लग्न झालेलं नसून तिचे इतर कुटुंबिय दक्षिण आफ्रिकेत रहात असल्याची माहिती समोर आली आहे. घरातील सोफ्यावर फेब्रुवारी २०२२ मध्ये मृतावस्थेत आढळली आहे. दरम्यान, सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरील तिच्या शेजाऱ्यांनी घरातून वास येत असल्याची तक्रार सोसायटीच्या चेअरनमकडे अनेकवेळा केली होती. ऑक्टोबर २०१९ पासून त्या घरातून वास येत असल्याची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपासणी केली होती. पण ती सुरक्षित असल्याचं सांगत पोलिसांनी तिच्या घरात प्रवेश केला नव्हता.

हेही वाचा: भारतात गरीब स्वप्नंही पाहू शकतो अन् पूर्णही करु शकतो; शपथ घेताना राष्ट्रपती मुर्मू भावूक

सदर महिलेला तिच्या शेजाऱ्यांनी एप्रिल २०१९ मध्ये शेवटचं पाहिलं होतं. जेव्हा तिचं भाडं देणं बंद झालं होतं त्यानंतर सोसायटीच्या कमिटीने तिच्या युनिव्हर्सल क्रेडिट पेमेंटकडे अर्ज करून तिच्या भाड्यासाठी मागणी केली होती. त्यानंतर तिच्या क्रेडिटमधून सोसायटीला प्रत्येक महिन्याला भाडे जात असल्याने कुणी तिला संपर्क करण्याचा प्रयत्न केला नाही. दरम्यान सोसायटीच्या कर्मचाऱ्यांनी गॅस कनेक्शनची तपासणी करत असताना या महिलेच्या घरातून कोणताही प्रतिसाद आला नव्हता. त्यानंतर तिचे गॅस कनेक्शन तोडण्यात आले होते.

Web Title: Women Dead From 2 Years In Flat Bur Rent Continues Landlord

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :deathglobal newsRent
go to top