World Bank : राज्यातील मागास जिल्ह्यांना अर्थसाह्य...जागतिक बँकेकडून १८.८२ कोटी डॉलरचे कर्ज मंजूर
World Bank Approves Loan For Maharashtra : जागतिक बँकेकडून महाराष्ट्रातील मागास जिल्ह्यांच्या आर्थिक विकासासाठी १८.८२ कोटी डॉलरचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे.
वॉशिंग्टन : महाराष्ट्रातील मागास जिल्ह्यांच्या आर्थिक विकासासाठी जागतिक बँकेकडून १८ कोटी ८२ लाख ८० हजार डॉलरचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. या जिल्ह्यांमध्ये विकासाकामांसह संस्थात्मक नियोजनासाठी या निधीचा वापर केला जाईल, असे जागतिक बँकेने म्हटले आहे.