esakal | World Emoji Day: सर्वांत पहिला इमोजी कोणी तयार केला माहितीये का?
sakal

बोलून बातमी शोधा

emoji

World Emoji Day: सर्वांत पहिला इमोजी कोणी तयार केला माहितीये का?

sakal_logo
By
स्वाती वेमूल

गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियावर संवाद साधण्यासाठी 'इमोजीं'चा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. वेगवेगळे इमोजी हे ऑनलाइन चॅटिंगचा अविभाज्य भाग बनले आहेत. आपला मूड, हावभाव, भावना व्यक्त करण्यासाठी या इमोजींची मोठी मदत होते. १७ जुलै रोजी 'जागतिक इमोजी दिवस' World Emoji Day म्हणून साजरा केला जातो. पण या इमोजींची सुरुवात कशी झाली आणि सर्वांत पहिला इमोजी कोणी तयार केला, हे तुम्हाला माहितीये का? (World Emoji Day History Significance who created first emoji and All You Need To Know slv92)

दरवर्षी युनिकोड कन्सोर्शियमद्वारे Unicode Consortium इमोजीसची यादी प्रकाशित आणि मंजूर केली जाते. मान्यता मिळाल्यानंतर इमोजीस प्रकाशित केले जातात आणि त्यानंतर Android आणि iOS सारख्या मोबाइल ऑपरेटिंग सिस्टमकडून त्यांच्या संबंधित प्लॅटफॉर्मवर ते आणले जातात. मान्यताप्राप्तीसाठी आलेल्या इमोजींवर मतदान करण्यासाठी युनिकोट कन्सोर्शियममध्ये सदस्य असतात. नेटफ्लिक्स, अॅपल, फेसबुक, गुगल आणि टिंडर ही काही सदस्यांची नावं आहेत.

पहिला इमोजी कोणी तयार केला?

१९९९ मध्ये एका जपानी मोबाइल ऑपरेटिंग कंपनीत काम करणाऱ्या इंजीनिअरने पहिला इमोजी तयार केला. मोबाइल इंटिग्रेटेड सर्व्हिस i-mode साठी शिगताका कुरीताने १७६ इमोजी तयार केले होते. नंतर २०१० मध्ये, युनिकोडने इमोजीसचा वापर प्रमाणित केला. यानंतर गुगल, मायक्रोसॉफ्ट, फेसबुक आणि ट्विटर यांनी इमोजींचे स्वत:चे व्हर्जन तयार करण्यास सुरुवात केली.

२०१४ मध्ये, इमोजीपीडियाचे संस्थापक जेरेमी बर्ज यांनी १७ जुलै या तारखेला जागतिक इमोजी दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. इमोजी तयार करण्यावर बंधनं नाहीत, मात्र ते नेटकऱ्यांना वापरात यावेत की नाही यासाठी युनिकोड कन्सोर्शियम ही संघटना काम करते. कोणताही नवा इमोजी तयार झाल्यानंतर सर्वांत आधी तो या संघटनेकडे परवानगीसाठी पाठवला जातो आणि त्यांच्या संमतीनंतर त्याचा वापर सर्वसामान्यांसाठी सुरू होते.

loading image