Pakistan ATM : जगातील सर्वात उंचावरील एटीएममध्ये पैशांसाठी कसरत

आज आपल्यापैकी अनेकांना रोख रक्कमेची गरज भासली की आपण बँकेऐवजी एटीएममध्ये जातो
 World Highest ATM Center
World Highest ATM CenterSakal
Updated on

Where Is World Highest ATM Center : आज आपल्यापैकी अनेकांना रोख रक्कमेची गरज भासली की आपण बँकेऐवजी एटीएममध्ये जातो. पण आज आम्ही आज तुम्हाला अशा एका एटीएमबद्दल सांगणार आहोत, जे कोणत्याही शहरात किंवा गावात नसून डोंगराच्या सर्वात उंच शिखरावर आहे.

 World Highest ATM Center
Youth Tips : 'बस कर पगले! रूलाएगा क्या'? वयाच्या १८ ते ३० मध्ये करू नका 'या' चुका
ATM
ATM

हे ऐकून तुम्हीही विचार करत असाल की, एवढ्या उंच शिखरावर एटीएम मशीन कुठल्या शहरात आणि देशात आहे. तर हे सर्वात उंच एटीएम भारताचा शेजारी देश पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या खुंजेरब पासवर बनवण्यात आले आहे. या एटीएमच्या आजूबाजूला वीज व्यवस्था नाही, पण तरीही ते अगदी सुस्थितीत काम करते. विशेष म्हणजे येथे लोक दररोज पैसे काढण्यासाठी येतात. हे एटीएम जगातील सर्वात उंच एटीएम म्हणून ओळखले जाते.

 World Highest ATM Center
Worlds Tallest Shiva Statue : जगातील सर्वात उंच भगवान शंकरांची मूर्ती कोणत्या राज्यात आहे?
saving money
saving money

जगातील सर्वात उंच एटीएम पाकिस्तानच्या खुंजेरब पासवर बांधण्यात आले आहे. 15,396 फूट उंचीवर वसलेले हे एटीएम बर्फाच्छादित पर्वतांनी वेढलेले आहे, जे 2016 मध्ये कार्यान्वित करण्यात आले होते. सर्वात अधिक उंचीवर असल्यामुळे याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.

पवन आणि सौर ऊर्जेवर चालते एटीएम

पाकिस्तानचा डोंगराळ प्रदेश असलेल्या गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये असलेले हे एटीएम परिसर नेहमीच बर्फाने झाकलेले असते. येथे वीज कनेक्शन नाही. त्यामुळे हे एटीएम सौर आणि पवन उर्जेवर चालते. या एटीएमच्या सर्वात जवळची बँक 82 किमी अंतरावर असून, एटीएममध्ये पैसे रिफील करण्यासाठी येथील कर्मचाऱ्यांना जोरदार वारा, वादळ, दरड, डोंगर आदींना पार करत यावे लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com