World Kiss Day किस करायलाच हवा...

टीम ई सकाळ
शनिवार, 6 जुलै 2019

जगभरात 6 जुलै हा जागतिक चुंबन दिवस म्हणून साजरा केला जातो. या चुंबन दिनाच्या निमित्ताने ओठांविषयीची गाणी...

जगभरात 6 जुलै हा जागतिक चुंबन दिवस म्हणून साजरा केला जातो. किस (चुंबन) केल्यामुळे काय होते किंवा चित्रपटामधूनही चुंबनावर विविध गाणी प्रसिद्ध झाली आहेत. चुंबन केल्याचे किती फायदे आहे हे जाणून घेऊयात...

आनंदी मन
चुंबन घेतल्यामुळे मन आनंदी राहते. चुंबनाचे क्षण आनंद देऊन जातात. आनंद देणारे हार्मोन रिलीज झाले की ताण कमी होतो आणि उत्साह वाढतो.

ताण कमी होतो
चुंबन घेतल्यामुळे ऑक्सीटोसिन हार्मोन रिलीज होते, त्यामुळे अस्वस्थता कमी होते आणि आपल्याला फील गुड व्हायला लागते. यामुळे आपोआप ताण कमी होतो.

बीपी वर नियंत्रण
चुंबन घेताना हार्ट रेट वाढून रक्त वाहिन्या रुंद होऊन विस्तार झाल्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतं. ज्याने रक्त दाब नियंत्रित राहतो.

डोकेदुखी पासून मुक्ती
डोकेदुखी होत असल्या एक कप चहा किंवा औषध घेण्याऐवजी चुंबन घ्या. यामुळे रिलीज होणारे हार्मोन रक्त वाहिन्यांना मोकळे करून रक्तदाबाचे स्तर कमी करते. हाय ब्लड प्रेशर आणि ताण हे डोकेदुखीचे प्रमुख कारण असून, चुंबन केल्याने यावर नियंत्रण राहते आणि डोकेदुखी गायब होते.

कोलेस्ट्रॉल नियंत्रण
चुंबन घेतल्याने अनहेल्दी कॅलरीज बर्न होते ज्यामुळे चुंबन कोलेस्ट्रॉलचे स्तर सुधारते.

इम्यून सिस्टम सुरळीत करतं
चुंबन घेताना सलाईवा एक्सचेंज होतात. सलाईवाद्वारे पार्टनरचे किटाणू आपल्यात आल्याने इम्यून सिस्टम सक्रिय होत आणि यांच्याशी लढण्यासाठी स्वत:ला तयार करते. इम्यून सिस्टम मजबूत होते.

ओरल हेल्थ
चुंबन सलाईवरी ग्लॅड्सचे कार्य सुरळीत करते, दात आणि तोंडात कमी कॅव्हिटी पैदा होते. हे ग्लॅड्स अधिक प्रमाणात सलाईवा पैदा करतात, ज्यामुळे दात आणि तोंडात अडकलेले अन्न कण निघून जातात. याने प्लाक किंवा ओरल कॅव्हिटीचा धोका कमी होतो.

एक आठवडाच प्रेमाला वाहिलेला असतो. त्यातला एक असतो चुंबन दिन. या चुंबन दिनाच्या निमित्ताने ओठांविषयीची गाणी...

होठों में ऐसी बात मैं दबा के चली आयी
खुल जाये वही बात तो दुहाई है दुहाई
हाँ रे हाँ, बात जिसमें, प्यार तो है,
ज़हर भी है, हाय

“होठों से छू लो तुम मेरा गीत अमर कर दो,
बन जाओ मीत मेरे मेरी प्रीत अमर कर दो”

जुम्मे के दिन किया जुम्मे का वादा
जुम्मे को तोड दिया जुम्मे का वादा .
ले आ गया रे फिर जुम्मा
चुम्मा दे दे

भीगे होंठ तेरे, प्यासा दिल मेरा
लगे अब्र सा, मुझे तन तेरा
जम के बरसा दे, मुझ पर घटायें
तू ही मेरी प्यास, तू ही मेरा जाम
कभी मेरे साथ, कोई रात गुज़ार
तुझे सुबह तक मैं करूँ प्यार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Kiss Day benefit for health