
नवी दिल्ली : आकाशात लखलखणाऱ्या विजेच्या अद्भूत नजाऱ्याने शास्त्रज्ञ अवाक झाले होते. कारण विजेचे हे चमकणे नेहमीप्रमाणे नव्हते. ती इतिहासातील सर्वांत लांबपर्यंत चमकलेली वीज होती. त्याला ‘मेगाफ्लॅश’ असे म्हणतात. अमेरिकेत २२ ऑक्टोबर २०१७ रोजी झालेल्या वादळाच्यावेळी ८२९ किलोमीटरपर्यंत वीज चमकली. सर्वांत जास्त काळ वीज चमकण्याचा एक नवीन जागतिक विक्रम नोंदविण्यात आला आहे.