'ही' आहे जगातील सर्वात उंच महिला; दुर्मिळ आजारानं वाढली 'उंची' I World Tallest Woman | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rumeysa Gelgi
सात फुटांपेक्षा जास्त उंच असलेल्या तुर्कीच्या महिलेनं 'सर्वात उंच महिला' म्हणून नवा विश्वविक्रम केलाय.

'ही' आहे जगातील सर्वात उंच महिला; दुर्मिळ आजारानं वाढली 'उंची'

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

World Tallest Woman : सात फुटांपेक्षा जास्त उंच असलेल्या तुर्की (Turkey) महिलेनं 'सर्वात उंच महिला' म्हणून नवा विश्वविक्रम केलाय. रुमेसा गेलगी (Rumeysa Gelgi) असं या महिलेचं नाव आहे. गेलगीची उंची वीवर सिंड्रोम (Weaver Syndrome) नावाच्या दुर्मिळ आजारामुळं 7 फूट 0.7 इंच (215.16 सेमी) पर्यंत वाढलीय.

रुमेसा गेलगीचं नाव आता गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही (Guinness World Records) नोंद झालंय. गेलगीला सर्वात उंच महिला असण्याची पदवीही (World Tallest Living Woman) बहाल करण्यात आलीय. 24 वर्षीय गेलगी उंची आणि वीवर सिंड्रोममुळे व्हिलचेअरचा वापर करते. तिला वीवर सिंड्रोम या जेनेटिक विकारानं (Weaver Syndrome) ग्रासलंय, यामुळे तिची उंची खूप वाढलीय.

हेही वाचा: बांगलादेशात दुर्गा पूजेदरम्यान हिंदू मंदिरावर हल्ला

Rumeysa Gelgi

Rumeysa Gelgi

'स्काय न्यूज'च्या मुलाखतीत रुमेसा गेलगी सांगते, प्रत्येक नुकसान तुमच्यासाठी नफ्यात बदलू शकतं, म्हणून तुम्ही कोण आहात हे स्वीकारा. तुमच्या क्षमतेची जाणीव ठेवा आणि सर्वोत्तम प्रयत्न करा, असा सल्ला ती देते. सन 2014 मध्ये गेलगीनं सर्वात जास्त काळ जगणाऱ्या किशोरवयीन मुलांच्या यादीत स्थान मिळवलं होतं आणि विश्वविक्रम केला होता. यानंतर, आता तिचं नाव दुसऱ्यांदा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवलं गेलंय.

हेही वाचा: चिंताजनक! भारतात उपासमारी वाढली; नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तानची स्थिती चांगली

जगातील सर्वात उंच पुरुषाच्या यादीत तुर्कीच्या सुलतान कोसेनचा (Sultan Kosen) समावेश आहे. 2018 मध्ये कोसेनची उंची 8 फूट 2.8 इंच (251 सेमी) मोजली गेली. तर जगातील सर्वात उंच महिलेचा विक्रम चीनच्या जेंग जिनलियनच्या नावावर आहे. जो 1982 मध्ये तिच्या मृत्यूपूर्वी 8 फूट 1 इंच (246.3 सेमी) होता.

loading image
go to top