Video Viral: दुबईत जगातील सर्वात खोल जलतरण तलाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Deep Dive Dubai

'डिप डाईव्ह दुबई' हा जगातील सर्वात खोल जलतरण तलाव आता सुरु झालाय आणि हा लवकरच पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्धी पावणार हे मात्र नक्की.

Video Viral: दुबईत जगातील सर्वात खोल जलतरण तलाव

दुबईचे प्रिन्स एचएच शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांनी ७ जुलै रोजी 'डिप डाईव्ह दुबई' जगासमोर आणला. ट्विटरवर 'डिप डाईव्ह दुबई'चा एक व्हिडिओही शेअर केला आहे.

जर तुम्हाला खोल पाण्यात पोहचायंचय आणि ड्रायव्हिंगचा आनंद घ्यायला आवडत असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी आहे. 'डिप डाईव्ह दुबई' हा जगातील सर्वात खोल जलतरण तलाव आता सुरु झालाय आणि हा लवकरच पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्धी होणार हे मात्र नक्की. 'डिप डाईव्ह दुबई' चा एक सुंदर व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हमदान बिन मोहम्मद यांनी ट्विटरवर आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ६० मीटर (१९६ फूट) खोल असलेल्या जगातील सर्वात खोल पूल 'डिप डाईव्ह दुबई' येथे संपूर्ण जग तुमची वाट पाहत आहे.

'डिप डाईव्ह दुबई' कुठे आहे?

'डिप डाईव्ह दुबई' हे नाद अल शेबा परिसरात स्थित आहे आणि जगातील सर्वात खोल जलतरण तलाव म्हणून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सनही त्याची नोंद घेतली असल्याचं दुबई सरकारच्या वेबसाइटवरील उपलब्ध प्रेस रिलीजवरुन समजतं.

'डिप डाईव्ह दुबई' ची वैशिष्ट्ये

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचं आदर्श उदाहरण असलेल्या डीप डायव्ह दुबईची खोली ६० मीटरपेक्षा जास्त असून त्यात १४ दशलक्ष लिटर पाणी आहे. त्याहून मनोरंजक गोष्ट म्हणजे या पूलमध्ये बुडलेले शहर देखील आहे, जे स्कुबा डायव्हिंग करणाऱ्यांना नक्कीच आकर्षित करेल.

येथे स्ट्रीटस्केपसह अपार्टमेंट, गॅरेज आणि आर्केडही आहे. फ्रीड्रायव्हिंग आणि स्कूबा ड्रायव्हिंगमध्ये स्वारस्य असलेल्यांना मदत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग व्यावसायिकांची एक टीमही तिथे उपस्थित आहे. तसेच ५६ अंडरवॉटर कॅमेरे आहेत, जे पूलचे सर्व भाग कव्हर करतात. ड्रायव्हिंगचा अनुभव आणखी चांगला करण्यासाठी साऊंड आणि मूड लाइटिंग सिस्टम देखील आहेत.

निवेदनात असेही म्हटले आहे की, "तलावाचे ताजे पाणी दर सहा तासांनी सिलिसियस वोल्कॅनिक रॉक, NASA-विकसित फिल्टर तंत्रज्ञान आणि युव्ही तंत्रज्ञानाद्वारे या क्षेत्रातील सर्वात मोठ्या आणि जलद फिल्टर प्रणालींद्वारे फिल्टर केले जाते.

'डिप डाईव्ह दुबई'साठी बुकिंग-

डिप डाईव्ह दुबई' सध्या केवळ निमंत्रिंतासाठी खुले आहे. सार्वजनिक बुकिंग जुलैच्या उत्तरार्धात त्यांच्या वेबसाइटवर उपलब्ध होईल. ज्याद्वारे तेथील रहिवासी आणि १० वर्षे आणि त्यावरील पर्यटकही तेथे जाऊ शकतील. नवशिके तसेच व्यावसायिक स्कुबा डायव्हर आणि खेळाडू तेथे भेट देऊ शकतील.

loading image
go to top