
वॉशिंग्टन, ता. १७ (पीटीआय) : अतिधनाढ्यांकडे सत्ता एकवटत असून त्याचा देशाला धोका आहे, असा इशारा अमेरिकेचे मावळते अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी नुकताच दिला असतानाच नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीसाठी तयार केलेल्या निमंत्रितांच्या यादीत जगातील सर्वांत श्रीमंत असलेल्या तीन व्यक्तींचा समावेश असल्याचे समजते.