जगातील सर्वात महागडी सिगारेट, एक झुरका घ्यायचा?

धूम्रपान न करण्याचा सल्ला प्रत्येकजण देतोच.
Worlds Top Five Most Expensive Cigarette Brands
Worlds Top Five Most Expensive Cigarette Brandsesakal
Summary

धूम्रपान न करण्याचा सल्ला प्रत्येकजण देतोच.

आरोग्यासाठी धूम्रपान (Smoking) करणे कोणत्याही प्रकारे फायदेशीर नाहीयेय. धूम्रपान न करण्याचा सल्ला प्रत्येकजण देतोच. असे असूनही अनेक लोक धूम्रपान करणे थांबवत नाहीत. सिगारेट ओढल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो असं तुम्हाला वाटत असेल तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही ब्रँड्स सिगारेट्सबद्दल सांगणार आहोत, ज्याचा परिणाम तुमच्या बँक खात्यावरही होऊ शकतो. ते जगातील सर्वात महागडे सिगारेट ब्रँड (Expensive Cigarette Brands) मानले जातात. त्यांची किंमत ऐकून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल.

Worlds Top Five Most Expensive Cigarette Brands
प्रसिद्ध सिगारेट 'चारमिनार'चं बाजारात दिसणं अचानक कमी का झालं?

जगात सिगारेटचे अनेक ब्रँड आहेत. यातील प्रत्येक सिगारेटचा आरोग्यावर (Health) वाईट परिणाम होतो. परंतु असे काही ब्रँड्स आहेत ज्यांची किंमत आपल्याला आश्चर्यचकित करेल. जगातल्या सर्वात महागड्या सिगारेटबद्दल बोलायचं झालं तर त्याला ट्रेझर (Treasurer Cigarette)म्हणतात. हे इंग्लंडच्या एका कंपनीचे उत्पादन (Product) आहे. हा ब्रँड तिथे प्रसिद्ध आहे. याच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर साडेचार हजार रुपयांत त्याचे एक पॅकेट मिळते. एका पॅकमध्ये १० सिगारेट असतात. म्हणजे एका सिगारेटचा डॅम साडेचारशे ते पाचशे रुपये असतो.

Worlds Top Five Most Expensive Cigarette Brands
वय वर्ष दोन, सिगारेट ओढायचा 40; व्यसन सुटताच बदललं रूप

याशिवाय जगातील सर्वात जुन्या सिगरेट ब्रँड सोब्रानीचाही (Sobrani Cigarette) या यादीत समावेश आहे. त्यातील एका पाकिटाची किंमत 800 ते 1200 रुपयांपर्यंत आहे. या यादीत पुढे आहे डेविडॉफ सिगारेट (Davidoff Cigarette). हा स्विस ब्रँड असून याच्या पॅकची किंमत एक हजार रुपये आहे. चौथ्या क्रमांकावर म्हणून पार्लिमेंट सिगारेट (Parliament Cigarette) आहे. हे तीन वेगवेगळ्या किंमतींना उपलब्ध आहे. त्याची किंमत साडेतीनशे ते सहाशे रुपयांपर्यंत आहे.

ऑस्ट्रियाचा नॅट शेरमन (Nat Sherman Cigarette) ब्रँडही बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे. जगातील सर्वात महागड्या सिगारेटच्या यादीत तिचा पाचवा क्रमांक लागला आहे. या कंपनीची स्थापना 1930 मध्ये झाली असून, त्यातील एका पाकिटाची किंमत 700 रुपयांपर्यंत आहे. या सिगारेटची किंमत पाहिली तर ती लोकांच्या आरोग्यावर तसेच बँक बॅलन्सवर परिणाम होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com