esakal | वुहानमधील पूल पार्टीचे चीनकडून समर्थन
sakal

बोलून बातमी शोधा

Wuhan-park-pool-party

पूलमध्ये चिंब भिजलेले विविध वयोगटांतील शेकडो नागरिक मनोरंजनपर कार्यक्रमाचा जल्लोष करीत असल्याचे व्हिडिओ व छायाचित्रे सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यामुळे जगभर संताप व्यक्त केला जात आहे.

वुहानमधील पूल पार्टीचे चीनकडून समर्थन

sakal_logo
By
वृत्तसंस्था

बिजिंग - तोबा गर्दी झालेल्या वुहानमधील पूल (तरण तलाव) पार्टीचे चीनने समर्थन केले आहे. पूलमध्ये चिंब भिजलेले विविध वयोगटांतील शेकडो नागरिक मनोरंजनपर कार्यक्रमाचा जल्लोष करीत असल्याचे व्हिडिओ व छायाचित्रे सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यामुळे जगभर संताप व्यक्त केला जात आहे.

जगातील बहुतांश भागांत लॉकडाउन असताना आणि बहुतेक लोक सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत असताना कोरोना विषाणूचे उगमस्थान मानले जाणाऱ्या वुहानमधील पार्टीचे वृत्त धक्कादायक ठरले. 15 ऑगस्ट रोजी झालेल्या पार्टीची छायाचित्रे एएफपी वृत्तसंस्थेने बुधवारी (ता. 19) जारी केली. त्यानंतर 24 तासांत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

ही पार्टी म्हणजे स्थानिक प्रशासनाने कोरोना साथीचा किती उत्तम पद्धतीने मुकाबला केला आहे हे दाखविणारे उदाहरण आहे, अशा शब्दांत समर्थन करण्यात आले. 

एक कोटी 60 लाख व्ह्यूज
एएफपीने पोस्ट केलेल्या व्हिडिओला तब्बल एक कोटी 60 लाख व्ह्यूज मिळाले.

ट्विटरवरून टीका
जगातील अनेकांनी ट्विटरचा आधार घेत चीनवर टीका केली. अत्यंत बेजबाबदारपरणा, कोरोना रुग्ण वाढण्यास कोणत्याही मार्गाने कारणीभूत ठरू नये अशी टीका चीनवर झाली.

नवा रुग्ण नाही
वुहानमध्ये गेला सुमारे महिनाभर एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. वर्षाच्या प्रारंभी लॉकडाउनची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वृत्तपत्रेही आमनेसामने
या प्रसंगावरून वृत्तपत्रेही आमनेसामने आली. ऑस्ट्रेलियातील डेली टेलीग्राफचा मथळा चीनला टोला देणारा होता. सारे जग विषाणूची किंमत जग चुकवीत असताना वुहानमधील जीवन मात्र आगळेवेगळे आहे असा याचा आशय होता. चीनच्यावतीने यास ग्लोबल टाईम्सने प्रत्युत्तर दिले. हे म्हणजे द्राक्षे आंबट असल्याचा प्रकार होय, असे चीनच्या या सरकारधार्जिण्या दैनिकाने म्हटले आहे.

वुहानमधील पार्टीमुळे युरोप आणि अमेरिकेतील लोकांना धक्का बसल्याचे वृत्त माझ्या पाहण्यात आले, पण धोरणात्मक पातळीवर वुहानने कोरोनावर विजय मिळविल्याचे स्पष्ट होते. कोरोना निर्मूलनासाठी आमच्या देशाने अवलंब केलेल्या धोरणाचे यशच ही छायाचित्रे दाखवितात.
- झाओ लिजीयन, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते 

loading image
go to top