'नमस्काराशिवाय योगाभ्यास' अमेरिकेतील 30 वर्षांचा वाद कायद्याने मिटवला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'नमस्काराशिवाय योगाभ्यास' अमेरिकेतील 30 वर्षांचा वाद कायद्याने मिटवला

'नमस्काराशिवाय योगाभ्यास' अमेरिकेतील 30 वर्षांचा वाद कायद्याने मिटवला

वॉशिंग्टन : अमेरिकेतील अल्बामा राज्यात आता शालेय विद्यार्थ्यांना नमस्काराचा समावेश नसलेल्या ‘योगा’चे शिक्षण (Yoga Eduaction) दिले जाणार आहे. अल्बामाचे गर्व्हनर के इवे यांनी यासंदर्भातील विधेयकास मंजुरी दिली आहे. या योगाभ्यासाला ‘माइंडफुलनेस ॲक्टिव्हिटी’ असे नाव दिले आहे. या स्वाक्षरीमुळे अल्बामा राज्यात योगा शिकवण्यासंदर्भात तीन दशकांपासून सुरू असलेला वाद आता मिटला आहे. (Yoga without Pranam ends 30 years of controversy in US)

हेही वाचा: चहा एवढाच त्याचा इतिहाससुद्धा आहे टेस्टी

भारतातील प्राचीन आणि लोकप्रिय योगाला जगभरात महत्त्व दिले जात असून त्यास अमेरिका देखील अपवाद नाही. विद्यार्थ्याच्या शारीरिक आणि मानसिक विकासाच्या दृष्टीने योगासनाचे महत्त्व पाहता अल्बामात शालेय मुलांना त्याचे धडे शिकवले जाणार आहे. वास्तविक तीन दशकांपूर्वी १९९३ रोजी योगा हा हिंदुत्वाशी निगडित असल्याने त्याचे शिक्षण देण्यास मनाई केली होती. मात्र आता अल्बामाच्या विधिमंडळाने या विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर गर्व्हनर इवे यांनी त्यावर स्वाक्षरी केली.

हेही वाचा: ‘नारद’ भ्रष्टाचारप्रकरणी तृणमूलचे नेते नजरकैदेत

आगामी शिक्षण सत्र सुरू होण्यापूर्वी १ ऑगस्ट रोजी हा कायदा लागू होईल. विशेष म्हणजे सध्या अनेक शाळेत योगाप्रमाणेच उपक्रम राबवले जात आहेत आणि त्याला माइंडफुल ॲक्टिव्हिटी असे नाव दिले आहे. नव्या कायद्यानुसार प्रणामाचा समावेश नसलेले योगासने विद्यार्थ्यांना शिकवण्यात येणार आहे. प्रांतीय सरकारच्या काही सदस्यांनी आणि ख्रिस्त संघटनांचा विरोध पाहता प्रणामविरहित योग प्रशिक्षण देण्याची तरतूद करण्यात आली. तसेच योगाभ्यासाचे इंग्रजी संस्करण असणे गरजेचे आहे, असेही कायद्यात म्हटले आहे.

loading image
go to top