महाराष्ट्रातून देवेंद्र, भारतातून नरेंद्र तर जपानमधून योगेंद्र

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 एप्रिल 2019

टोकीयो : भारतामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत असून, हे वारे जपानच्या दिशेने वाहत आहेत. जपानमध्ये भारतीय वंशांचे योंगेंद्र पुराणिक हे टोकीयोमधून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. मुळचे पुण्याचे रहिवासी असलेले योंगेंद्र सध्या जपानमध्ये स्थायिक आहेत.

टोकीयो : भारतामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत असून, हे वारे जपानच्या दिशेने वाहत आहेत. जपानमध्ये भारतीय वंशांचे योंगेंद्र पुराणिक हे टोकीयोमधून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. मुळचे पुण्याचे रहिवासी असलेले योंगेंद्र सध्या जपानमध्ये स्थायिक आहेत. जपानमध्ये ते 'योगी'म्हणून ओळखले जातात. ''महाराष्ट्रातून देवेंद्र, भारतातून नरेंद्र तर जपानमधून योगेंद्र'' अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये सुरु आहे.

जपानमधील महापालिका निवडणुकीने महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे. बिगर जपानी आणि स्थानिक जपानीमधील नागरिकांसाठी ते निवडणूक लढवत असून, जपानमधील स्थानिक शाळांमध्ये इंग्रजी भाषेला वाव मिळावा, तसेच जपानमध्ये स्थायिक भारतीय नागरिकांच्या निवृत्ती वेतनाचा प्रश्न सोडविण्यासाठी ते राजकारणात आल्याचे त्यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. 

जपानमधील 'कॉन्स्टिट्युशनल डेमोक्रॉटिक पार्टी ऑफ जपान' पक्षातर्फे 'योगी' निवडणूक लढत आहेत. टोकीयो येथील येदोगावा मतदारसंघातून 'योगी' निवडणूकीत उतरले आहेत. या मतदारसंघात साडेचार हजार पेक्षा जास्त भारतीय नागरिक असून त्यांचा 'योगी' यांना पाठिंबा आहे. येथील काही स्थानिक जपानी नागरिकांचा देखील योगी यांना पाठिंबा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: yogendra puranik is contesting in election at japan