esakal | तासाभराच्या खोळंब्यानंतर यू ट्यूब पुन्हा सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

Youtube

यू ट्यूब डाऊन होताच जगभरातून युजर्सनी विविध माध्यमातून नाराजी दर्शविली. त्यासाठी ट्विटर आणि फेसबुकचा वापर करण्यात आला. अखेर तासाभराच्या खोळंब्यानंतर यू ट्यूब पुन्हा सुरु झाले.

तासाभराच्या खोळंब्यानंतर यू ट्यूब पुन्हा सुरु

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जगभरात व्हिडिओ पाहण्यासाठी वापरण्यात येणारे यू ट्यूब तासभर बंद पडल्याने युजर्सकडून नाराजी दर्शविण्यात आली. अखेर तासाच्या खोळंब्यानंतर यू ट्यूब पुन्हा सुरु झाले आहे.

आज (बुधवार) सकाळीच जगभरातील युजर्सला यू ट्यूब सुरु केल्यानंतर 500 आणि 503 ही इंटर्नल एरर दिसू लागले. त्यामुळे युजर्सकडून तत्काळ याबाबतची माहिती यू ट्यूबला कळविण्यात आली. यू ट्यूबनेही तांत्रिक कारणामुळे सेवा बंद झाल्याचे सांगितले. यू ट्यूबने ट्विट करत काम सुरु असल्याचे सांगितले.

यू ट्यूब डाऊन होताच जगभरातून युजर्सनी विविध माध्यमातून नाराजी दर्शविली. त्यासाठी ट्विटर आणि फेसबुकचा वापर करण्यात आला. अखेर तासाभराच्या खोळंब्यानंतर यू ट्यूब पुन्हा सुरु झाले.

loading image