अफगाणिस्तानी नागरिकांचे आदरातिथ्य लाजवाब!

Afghanistan: Taliban attack German consulate
Afghanistan: Taliban attack German consulate

पाटणी: ‘‘ अफगाणिस्तानमध्‍ये भारत व भारतीय नागरिकांबद्दल आदराची भावना आहे. मी तेथे गेलो तेव्हा अफगाणी नागरिकांनी माझे आदरातिथ्य करण्यात कोणतीही कसूर सोडली नाही. त्यावेळी तेथील जीवन सामान्य होते. मुली शाळेत जात होत्या, महिला ऑफिसमध्ये काम करीत होत्या. पण आता स्थिती बदलली आहे. अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळविल्यानंतर परिस्थिती कधी सुधारेल सांगता येत नाही,’’ असे शुभम म्हणाला. तेथे बॉलिवूडबद्दलही प्रचंड आकर्षण असून अनेक जण चित्रपट पाहून हिंदी बोलायला शिकले आहेत, असेही त्याने सांगितले.

बिहारमधील मुंगेर गावात राहणारा व आतापर्यंत ५० पेक्षा जास्त देश फिरलेला प्रसिद्ध युवा यूट्यूबर शुभम (वय २०) हा काही महिन्यांपूर्वीच अफगाणिस्तानला गेला होता. त्‍यावेळी तेथे शांतता होती व जनजीवनही सुरळीत होते. अफगाणिस्तान भेटीचे अनेक व्‍हिडिओ त्‍याच्या यूट्यूबवरील ‘नोमॅड शुभम’ नावाच्या चॅनेलवर प्रसिद्ध झाले आहे. तालिबान्यांच्या ताब्यात जाण्यापूर्वीचा अफगाणिस्तान कसा होता, यूट्यूबर म्हणून तेथील अनुभव याविषयी शुभमने खास ‘सकाळ’च्या प्रतिनिधीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. ‘‘अफगाणिस्तानमधील सुरक्षेबद्दल सांगताना शुभम म्हणाला की, काबूलसारख्या मोठ्या व महत्त्वाच्या शहरात जागोजागी पोलिस, सैन्य यांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळाला. तेथील विविध देशांचे दूतावास व कार्यालयांप्रमाणेच हॉटेल, घरे यांच्याभोवतीही सुरक्षेसाठी मजबूत सीमाभिंत असते. काबूलमध्ये एका हॉटेलमध्‍ये राहत असताना खोलीच्या दरवाजाला चार-चार लॉक होते,’’ असे त्याने सांगितले.

Afghanistan: Taliban attack German consulate
अजित पवार निधीसाठी साथ देत नाहीत; काँग्रेसचा आरोप

तालिबान्यांने दर्शन

अफगाणी सैन्याचा पहारा असला तरी मनात भीती जाणवत होते, अशी कबुली देताना शुभमने मजार-ए-शरीफ भेटीतील काही प्रसंग सांगितले. तो तेथे दोन-तीन दिवस राहिला होता. व्हिडिओ चित्रीकरणासाठी तो तालिबान व पूर्वीच्या अफगाणी सरकारच्या ताब्यातील भागात सीमा प्रदेशात पोचला तेव्हा स्वतःच्या संरक्षणासाठी त्याने सलवार, टोपी व बूट असा अफगाणी पोशाख परिधान केला होता. याच काळात तो व तालिबानी दहशतवादी समोरासमोर आले. पण ते काहीही न बोलता मान झुकवून पुढे निघून गेल्याने शुभमने सुटकेचा निश्‍वास सोडला.

Afghanistan: Taliban attack German consulate
तीन दिवसांत राणेंच्या आशीर्वाद यात्रेवर 40 गुन्हे दाखल

भारतीयांबद्दल प्रेम

अफगाणी नागरिकांविषयी बोलताना शुभम म्हणतो, ‘‘मी इतके देश फिरलो आहे, पण असे अफगाणिस्तानसारखे आदरातिथ्य कोठेही अनुभवले नाही. तेथील अन्नपदार्थही अत्यंत चविष्ट होते. तेथील जनतेमध्ये भारत व भारतीयांप्रती प्रेम व आदर आहे. भारत किंवा हिंदुस्तानहून आलो, असे सांगताच अफगाणी नागरिक चहा, नाष्टा-जेवणाचे निमंत्रण देत असत. काही जण तर घरी राहण्याचा आग्रह करीत असे.’’ तेथे काही ठिकाणी काम करणाऱ्या युवतींनीही खूप मदत केल्याचे त्याने आवर्जून सांगितले.

Afghanistan: Taliban attack German consulate
सकारात्मक बातमी! 15 जिल्ह्यातील कोरोना रुग्ण 100 च्या आत

अडकलेल्या अनेकांना मदतीचा हात

शुभमचे अफगाणिस्तानवरील व्हिडिओ यूट्यूबर प्रसारित होत असतानाच तेथे तालिबान्‍यांनी नियंत्रण मिळविल्याच्या बातम्या येण्यास सुरुवात झाली. दहा लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर असलेल्या शुभमच्या चिंतेने अनेकांनी त्याची विचारपूस केली. पण तालिबान्यांच्या संघर्षापूर्वीच तो अफगाणिस्तानमधून बाहेर पडला होता. सध्या तो रशियात सुखरूप आहे. पण अफगाणिस्तान लोकांचे, त्‍याला सहाकार्य केलेल्या मुलींचे, टॅक्सीचालक व तेथे ओळख झालेल्यांचे काय झाले याची चिंता त्याला वाटत आहे. तेथ अडचणीत असलेल्या अनेकांसीठी शुभम मानवतेच्या दृष्टिकोनातून विविध प्रकारे मदत केली आहे. अफगाणिस्तानमधून बाहेर पडण्यासाठी विमान तिकिटासाठी मदत केल्याने मजार-ए- शरीफ येथील एका तरुण टॅक्सीचालकाने व्हिडिओच्‍या माध्यमातून शुभमचे खास आभार मानले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com