
युनायटेड किंगडम मधील एक युट्यूबर (YouTuber) तब्बल सात मिनिटे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती (World Richest Person) बनला होता. त्याची एकूण संपत्ती जवळापास एलन मस्कपेक्षा (Elon Musk) दुप्पट होती. या अवलिया युट्यूबरचं (Max Fosh) नाव आहे मॅक्स फॉश. त्याचे युट्यूबवर 6 लाख फॉलोवर्स आहेत. त्याने हा कारनामा कसा केला हे सांगणाला एक व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनेलवर शेअर केला. त्याला त्याने एलन माझ्याकडे ये असे डिस्किप्शन देखील दिले होते. (YouTuber Max Fosh claims that he became the world richest person for 7 minutes)
या व्हिडिओत मॅक्सने सांगितले की, 'जर समजा मी 1000 कोटी शेअर्सची अनलिमिटेड मनी लिमिटेड नावाची कंपनी रजिस्टर केली. त्याचे शेअर्स गुंवतणूक संधी म्हणून मी 50 पौंडाला विकले तर त्या कंपनीची अधिकृत किंमत ही 50,000 कोटी इतकी होते. (तांत्रिक दृष्ट्या)' मॅक्सच्या या व्हिडिओला 5.75 लाख व्ह्यूज मिळाले आहेत.
तो या व्हिडिओत म्हणतो की, 'यामुळे मी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होईन. माझा प्रतिस्पर्धी एलन मस्कला देखील मी फार मागे टाकेन.' मात्र यात एक मेख आहे. असं केल्याने त्याच्यावर फसवणूक केल्याचा आरोप लागेल. ही चांगली गोष्ट नाही असेही मॅक्स म्हणतो.
मॅक्सच्या या 8.30 मिनिटांच्या व्हिडिओत त्याने शून्यातून अनलिमिटेड मनी लिमिटेड कंपनी तयार केली. नोदंणीच्या प्रक्रियेत तो ही कंपनी काय करते या रकाण्यात पैसा तयार करते असे भरणार होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.