Ukraine Support : झेलेन्स्की, तुम्ही एकटे नाहीत; डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संघर्षानंतर युक्रेनच्या मदतीसाठी युरोप पुढे
Volodymyr Zelenskyy : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात ओव्हल ऑफिसमध्ये तणावपूर्ण चर्चा झाली. यानंतर युरोपसह अनेक देशांनी युक्रेनच्या पाठिंब्याचा पुनरुच्चार केला.
न्यूयॉर्क : युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात शुक्रवारी रात्री झालेल्या भेटीत उभय नेत्यांमध्ये संघर्ष झाला. ओव्हल ऑफिसमध्ये झालेल्या या बैठकीला अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी.व्हान्स हेही उपस्थित होते.