लाजेपायी महिला लपवून ठेवतात हे १० आजार; तिसरा आजार आहे सर्वांत घातक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

women health

लाजेपायी महिला लपवून ठेवतात हे १० आजार; तिसरा आजार आहे सर्वांत घातक

मुंबई : आरोग्यविषयक समस्यांचा धोका पुरुषांपेक्षा महिलांना अधिक असतो. अनेकदा महिला आपल्या आरोग्याविषयी मोकळेपणाने बोलत नाहीत. आपल्या आजारांविषयी माहिती देत नाहीत. दर ४ पैकी ३ महिला गरज असतानाही डॉक्टरकडे जाणे टाळतात; कारण त्या आपल्या आजाराला क्षुल्लक समजत असतात किंवा त्यांना त्याविषयी बोलण्याची लाज वाटते.

स्पॉटिंग

मासिक पाळीदरम्यान स्पॉटिंग होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. गर्भनिरोधक गोळ्या थांबवणे किंवा ताणतणाव यांमुळे ही समस्या उद्भवू शकते. हे टाळण्यासाठी गरम पाण्याने आंघोळ करा, मालिश करा. विनाकारण ही समस्या जाणवत असेल तर स्त्रीरोग तज्ज्ञांची मदत घ्या.

हेही वाचा: सरकारने बूस्टर डोस सुरू करावा; महिला आरोग्य कर्मचाऱ्याची मागणी

योनिशोथ (Vaginitis)

योनिमार्गामध्ये सूज येते. यामुळे खाज, दुर्गंधी, white discharge आणि वेदना होऊ शकतात. टॅम्पॉन, साबण, ल्युब्रिकण्ट ही त्यामागील कारणे असू शकतात. सुगंधी उत्पादनांचा वापर कमी करा आणि नैसर्गिक साबणाने हळूवारपणे धुवा.

सिस्ट

साधारणपणे सिस्ट काही काळाने नाहीसे होतात. वुल्वर सिस्ट (Vulvar cysts) बाह्य त्वचेवर दिसून येतात. veginal cysts योनीच्या अंतर्गत त्वचेवर दिसून येतात. यावर चांगला घरगुती उपाय म्हणजे सिट्ज़ बाथ होय. संसर्ग वाढण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

टाइट-सिंथेटिक अंतर्वस्त्रांमुळे उद्भवणारी समस्या

घट्ट अंतर्वस्त्रे घातल्याने घर्षण होते व गरम होते. त्यामुळे बॅक्टेरिया निर्माण होऊन संसर्ग पसरतो.

कोरडेपणा

हार्मोनल असंतुलन, रजोनिवृत्ति, प्रसव किंवा स्तनपान यांमुळे निर्माण झालेल्या कोरडेपणामुळे त्रास होतो.

इतर समस्या

रसायनयुक्त उत्पादनांचा वापर केल्याने प्रजनन इंद्रियामध्ये संसर्गाचा धोका उद्भवतो. तसेच प्रजनन इंद्रियामध्ये दुर्गंधी, एसटीई किंवा एसटीडीची लक्षणे, ingrown hairsमुळे उद्भवणारी समस्या आणि vulvodynia चा धोका यांकडे दुर्लक्ष करू नये.

टॅग्स :women health