

फुलंब्री : तालुक्यामध्ये पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत शून्य ते सहा वयोगटातील मुलांचे वजन व उंचीचे मोजमाप करण्यात आले. यामध्ये फुलंब्री तालुक्यात १७२ बालके कुपोषित आढळून आली. त्यामुळे आता प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत औषधोपचार व सकस पोषण आहार देण्यावर भर राहणार असल्याची माहिती महिला एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी मनीषा कदम यांनी मंगळवारी दिली आहे.