

Silent Health Risks Behind 99% Heart Attacks in India
sakal
Hidden Lifestyle Diseases India: आजकाल होणाऱ्या बऱ्यापैकी मोठ्या जीवनशैली बदलांमुळे हृदयविकार भारतात एक मोठं आरोग्याचं संकट बनलं आहे. व्यवस्थित व्यायाम करणाऱ्या, योग्य आहार आणि निरोगी बांधा असलेल्या आणि कोणतीही फॅमिली हिस्टरी नसलेल्या लोकांनाही सध्या हार्ट अटॅक येऊ लागला आहे. आपल्या देशात जवळपास ९९% हृदयविकार, तसेच स्ट्रोक किंवा हृदयविकारामुळे होणारे इतर गंभीर आजारांचं कारण काही ना काही अत्यंत महत्त्वाचे पण अदृश्य जोखमीचे घटक आहेत.
हे सुरुवातीला दिसत नसल्यामुळे आणि त्यांची लक्षणं उशिरा दिसत असल्यामुळे अनेकांना वेळेवर त्यांची ओळख पटवणं आणि प्रतिबंध करणं अवघड होतं. म्हणूनच तज्ज्ञ सांगतात पुढील आरोग्यविषयक जोखीम तुम्हाला असतील तर वेळीच काळजी घेण्याची गरज आहे.