

Best Ayurvedic remedies for frequent acidity: आजकाल अयोग्य खाण्याच्या सवयी आणि जीवनशैलीमुळे अनेकांना पचनासंबंधित समस्या निर्माण होतात. या समस्यांपैकी एक म्हणजे अॅसिडिटीची समस्या आहे.
मसालेदार पदार्थांचे सेवन, कॅफिनचे जास्त सेवन, धूम्रपान, मद्यपान आणि ताण यामुळे अॅसिडिटी होऊ शकते. आम्लपित्त झाल्यास छातीत जळजळ होणे, वारंवार आंबट ढेकर येणे, उलट्या किंवा मळमळ होणे आणि तोंडात घाणेरडे पाणी येणे यासारख्या समस्या उद्भवू लागतात.
या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी अनेक लोक औषधे घेतात. परंतु या औषधांचे जास्त सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. तुम्हाला या समस्येपासून सुटका हवी असेल तर आयुर्वेदिक उपाय करू शकता.