

Women Health Care: शरीर निरोगी ठेवण्यासाठी अनेक प्रकारची जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर पोषक तत्वांची आवश्यकता असते. व्हिटॅमिन डी देखील शरीरासाठी एक महत्त्वपूर्ण पोषक तत्व आहे. जे शरीरात अनेक कार्ये करण्यासाठी जबाबदार आहे.
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे, हाडे मजबूत करणे आणि मानसिक आरोग्य राखणे आवश्यक आहे. शरीरात याची कमतरता असल्यास अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्याच्या कमतरतेमुळे आरोग्यावर खास तर महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
संशोधनानुसार, भारतातील पुरुषांपेक्षा महिलांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता जास्त प्रमाणात आढळते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे महिलांमध्ये हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयविकार यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. एवढेच नाही तर गरोदरपणात व्हिटॅमिन डीची पातळी कमी झाल्यास प्री-एक्लॅम्पसिया आणि गर्भधारणा मधुमेह होऊ शकतो. शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरता असल्यास कोणते लक्षणे दिसतात हे जाणून घेऊया.