
Superfoods To Boost Vitamin B12 Effectively: आपल्या शरीराला पोषकतत्वे आणि जीवनसत्त्वांची आवश्यकता असते. व्हिटॅमिन B12 हे त्यापैकीच एक आणि शरीरासाठी आवश्यक असलेले एक महत्त्वपूर्ण पोषकतत्त्व आहे. ज्यामुळे रक्तातील लाल पेशी तयार करण्यास मदत होते तसेच मेंदू आणि मज्जासंस्थेच्या कार्यासाठी उपयुक्त ठरते. याची कमतरता झाल्यास अशक्तपणा, थकवा, डोकेदुखी, स्मरणशक्ती कमी होणे आणि मानसिक तणाव जाणवू शकतो. अनेक भारतीयांमध्ये या जीवनसत्वाची कमतरता आढळते.