Foods to Cut Prostate Risk: प्रोस्टेट कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी पुरुषांनी 'हे' 6 सुपरफूड्स न चुकता खाल्ले पाहिजेत

How To Reduce Prostate Cancer Risk Naturally: प्रोस्टेट कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी पुरुषांनी आहारात हे ६ सुपरफूड्स नक्की समाविष्ट करावे.
Joe Biden Diagnosed With Prostate Cancer | Foods to Cut Prostate Risk
Joe Biden Diagnosed With Prostate Cancer | Foods to Cut Prostate Risksakal
Updated on

Joe Biden Diagnosed With Prostate Cancer: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कर्करोग असल्याचे नुकतेच समोर आले आहे. वयाच्या ८२ वर्षीय बायडेन यांनी लघवी करताना त्रास होतोय अशी तक्रार नोंदवल्यानंतर तपासणीत त्यांच्या प्रोस्टेटमध्ये गाठ आढळून आली आणि ती कर्करोगाची असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा कर्करोग आक्रमक असून त्यांच्या हाडांपर्यंत पसरलेला आहे हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.

वय वाढत चालल्यावर पुरुषांमध्ये प्रोस्टेट कर्करोगाचा धोका वाढतो. प्रोस्टेट ग्रंथी ही पुरुषांच्या प्रजनन प्रणालीतील एक महत्त्वाची ग्रंथी आहे. ही ग्रंथी मूत्राशयाच्या खाली आणि गुदद्वाराच्या पुढील बाजूला असते. वयोमानानुसार यामध्ये वाढ होणे किंवा अन्य समस्यांमुळे प्रोस्टेट कर्करोगाचा धोका संभवतो. त्यामुळे योग्य ती काळजी घेणे आणि या आजाराबाबत सतर्कता बाळघणे गरजेचे आहे. अशातच योग्य जीवनशैली आणि संतुलित आहार यामुळे या धोक्याला बऱ्याच अंशी टाळता येऊ शकते.

काही विशष्ट सुपरफूड्सचा आहारात समावेश केल्यास पुरुषांच्या प्रोस्टेटच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

भोपळ्याच्या बिया

भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. झिंक हा घटक प्रोस्टेटच्या कार्यासाठी अत्यावश्यक असून पुरुष प्रजनन क्षमतेसाठीही उपयुक्त आहे. त्यामुळे दररोजच्या आहारात भोपळ्याच्या बिया समाविष्ट कराव्यात.

अंडी

वय वाढल्यावर स्नायूंची ताकद कमी होते. अंडी हा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. त्यात व्हिटॅमिन D, ओमेगा-३ आणि कोलीनसारखे पोषणद्रव्य असतात. कोलीन हे जनुकीय स्तरावर चरबी संचय कमी करणारे कार्य करते.

बीट

बीटामध्ये नैसर्गिक नायट्रेट्स मुबलक प्रमाणात असतात. हे घटक रक्तदाब नियंत्रित करण्यास, हृदयाचे आरोग्य सुधारण्यास आणि शरीराची सहनशक्ती वाढविण्यास मदत करतात. यामध्ये पोटॅशियमसुद्धा भरपूर प्रमाणात असते, जे शरीरातील अतिरिक्त क्षार बाहेर टाकण्यास मदत करते.

मासे

माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड्स असतात. हे घटक शरीरातील सूज किंवा जळजळ कमी करण्यासाठी आणि प्रोस्टेट आरोग्य सुधारण्यासाठी फायदेशीर ठरतात.

सोया उत्पादने

सोयामध्ये आढळणाऱ्या आयसोफ्लेव्होन्स या घटकांचा सौम्य एस्ट्रोजेनिक प्रभाव असतो. त्यांचा अँटीऑक्सिडंट गुणधर्म आणि पेशींमध्ये होणाऱ्या अनावश्यक वाढीवर (एपोप्टोसिस) नियंत्रण ठेवण्याचे कार्य प्रोस्टेट कर्करोग टाळण्यासाठी मदत करते.

बेरीज

स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, ब्लॅकबेरी आणि रास्पबेरी यांसारख्या फळांमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. हे घटक शरीरात होणारी सूज आणि पेशींवरील हानी कमी करतात. यामधील व्हिटॅमिन C लघवीशी संबंधित समस्या आणि प्रोस्टेट ग्रंथीच्या वाढीस प्रतिबंध करण्यास मदत करते.

विशेषत: वयस्कर पुरुषांनी नियमित आरोग्य तपासणी करणे, मद्यपान व धूम्रपान टाळणे, आणि संतुलित आहारासोबत व्यायाम करणे हे अत्यंत गरजेचे आहे. प्रोस्टेट आरोग्याबद्दल जागरुकता वाढवणे हेही महत्त्वाचे आहे. अनेकदा पुरुष आपल्या आरोग्यविषयक समस्यांकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे पुढे गंभीर आजारा होण्याचा शक्यता असते.

त्यामुळे आरोग्यदायी आयुष्यासाठी जीवनशैलीत योग्य बदल आणि योग्य आहार हेच उत्तम उपाय आहेत.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com