Dope Test Before Marriage: नशा कराल तर तुमचं लग्न होणार नाही, डोप टेस्ट म्हणजे काय? लग्नाच्या आधी अनिवार्य करण्याची संसदेत मागणी
What is a Dope Test: आप खासदार मलविंदर सिंग कांग यांनी लग्नाआधी डोप टेस्ट अनिवार्य करण्याची मागणी केली; जाणून घ्या डोप टेस्ट म्हणजे नेमकं काय आणि का आहे महत्त्वाची.
आपचे खासदार मलविंदर सिंग कांग यांनी शुक्रवारी संसदेत महत्त्वाची मागणी केली. लग्नापूर्वी वर म्हणजेच मुलाची डोप टेस्ट (Drug Test) आणि वैद्यकीय तपासणी अनिवार्य करावी, असा त्यांनी प्रस्ताव मांडला.