आरोग्याचे ‘बाळ’कडू : जलशुष्कता आणि ओआरएस

लहान बाळांतील जलशुष्कतेची लक्षणे ओळखा, वेळेवर ओआरएस व योग्य द्रवपदार्थांनी उपचार करून किडनी फेल्युअर, झटके यांसारख्या गंभीर गुंतागुंतीपासून बचाव करा
Dehydration in children: Recognize the warning signs and use ORS correctly during vomiting and diarrhoea.

Dehydration in children: Recognize the warning signs and use ORS correctly during vomiting and diarrhoea.

Sakal

Updated on

डॉ. संजय जानवळे, बालरोगतज्ज्ञ

नुकताच ‘वर्ल्ड ओआरएस डे’ साजरा करण्यात आला. मुलांत, खासकरून एका वर्षाखालील लहान बालकांत जलशुष्कता (dehydration) होणे, ही अनेक आजारांत आढळणारी गंभीर गुंतागुंत. मुलाच्या शरीरातले पाणी उलट्यांतून, जुलाबांतून शरीराबाहेर पडते. ‘डिहायड्रेशन’ ही गंभीर बाब असून त्यावर तातडीने इलाज करावे लागतात.

शरीराचे कार्य नीट चालावे, शरीरातल्या विविध क्रियांतून निर्माण होणारे विषारी घटक किडनीद्वारे शरीराबाहेर टाकण्यासाठी व रक्तात असलेल्या महत्त्वाच्या इलेक्ट्रोलाइट्सचे प्रमाण योग्य मर्यादेत राखण्यासाठी पाण्याची नितांत गरज असते. शरीरातून पाणी बाहेर पडण्याचे प्रमाण अधिक असल्यास आणि पाण्याची ही कमतरता शरीरात भरून काढण्याचे प्रमाण कमी असेल, तर डिहायड्रेशन होते. आपल्या शरीरातून पाणी लघवीवाटे, त्वचेतून, श्वासावाटे बाहेर पडते; तसेच ते उलट्या व जुलाबांतून. कडक ताप असेल, तर शरीरातून पाणी बाहेर पडण्याचे प्रमाण अधिक असते. मधुमेहासारख्या आजारात लघवीचे प्रमाण वाढलेले असल्याने डिहायड्रेशन होत असते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com