

Millets: Nutritious grains for a healthier lifestyle.
Sakal
डॉ. मालविका तांबे
सध्याच्या काळात धान्याबद्दलची जागरूकता सगळीकडे खूप वाढलेली दिसते आहे. काही काळापूर्वी धान्य म्हटलं की फक्त डोळ्यासमोर गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी एवढीच विचारात यायची. पण सध्याच्या काळामध्ये मिलेट्स अर्थात तृणधान्ये ही बरीच प्रचलनात आलेली आहेत. आयुर्वेदशास्त्राने हजारो वर्षांपूर्वीसुद्धा प्रत्येक धान्याबद्दल खूप सविस्तर माहिती दिलेली आहे. कुठले धान्य कशासाठी उत्तम राहील, कोणी खाल्लेलं चालेल व त्याला कशा प्रकारे शिजवावं या सगळ्याबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे. आज आपण या धान्यांपैकी काही महत्त्वाच्या व सगळीकडे प्रचलित असलेल्या धान्यांबद्दल माहिती घेऊया.