

Bhagyashree Recommends This Traditional Rajasthani Drink To Fight Cold And Cough
sakal
Bhagyashree Healthy Food Habits: हिवाळा सुरु झाला की सर्दी-खोकला, अंगदुखी, थकवा यासारख्या आरोग्याच्या तक्रारी व्हायला सुरुवात होते. अशा वेळी महागड्या गोळ्या, औषधं यापेक्षा घरगुती आणि पारंपरिक उपाय जास्त प्रभावी ठरतात. म्हणूनच घरात कोणी आजारी पडलं की कुटुंबातील वयस्कर मंडळी लगेच काढा किंवा घरगुती सोपे उपाय करायला सांगतात. आरोग्यदायी आणि पारंपरिक पदार्थांची आवड असलेली अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाज्याश्रीने हिवाळ्यात शरीराला उष्णता देणारं आणि प्रतिकारशक्ती वाढवणारं एक खास राजस्थानी पेय ट्राय केलं आहे.