

Brain Tumor Detected Through MRI
Sakal
डॉ. जयदेव पंचवाघ - मेंदू आणि स्पाइन सर्जन
‘‘डॉक्टर, अंजलीला गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून भयंकर डोकेदुखी सतावते आहे. सुरुवातीला वाटलं, की कामाच्या ताणामुळे किंवा पित्तामुळे असेल; पण मागच्या आठवडाभरात हा त्रास इतका वाढलाय, की आता तिला नीट चालताही येत नाहीये, सतत तोल जातोय. कालपासून तर जे काही थोडं खाल्लं त्याची लगेच तिला उलटी होतेय,’’ अंजलीचे वडील अत्यंत काळजीत पडून मला सांगत होते.