Benefits of Aliv: अळिवाचे फायदे...!

रुग्णाला डायट चार्टमध्ये अळिवाचा उल्लेख करते तेव्हा त्यांना समजून सांगायला खूप अडचणी येतात
 Aliv Ladoo aliv seeds benefits in marathi social media
 Aliv Ladoo aliv seeds benefits in marathi social mediasakal

डॉ. कोमल बोरसे

सध्याच्या काळात आपल्याला एक गोष्ट लक्षात येत आहे, ती म्हणजे आहाराबद्दल आणि आरोग्याबद्दल लोक सजग होत चालले आहेत. सोशल मीडियाचा वापर करून या सगळ्याबद्दल माहिती खूप वेगाने पसरवली जाते.

कधी ती माहिती योग्य असते तर कधी अयोग्य. आहाराच्या बाबतीत बोलायचे झाल्यास दरवर्षी काही ना काही एक पदार्थ येतो, जो सगळेच वापरतात म्हणजे त्याचा एक ट्रेडच तयार होतो. एकेकाळी सफरचंद,

सिडार, चिया सीड, जवस, मोरिंगा पावडर, ग्रीन टी, ग्रीन कॉपी, ब्लॅक कॉफी, मधपाणी हे सगळे खाणे योग्य की अयोग्य, कोणासाठी ते पचणारे आहे की नाही हे कुणीही बघत नाही. फक्त सोशल मीडियावर दाखवले म्हणून सगळे त्याचा वापर करून पाहतात. परंतु आपल्या पारंपारिक पदार्थांना विसरून गेलो आहोत.

त्याकडे कोणी लक्ष देत नाही. चिया सीड सगळ्यांना माहिती आहे, परंतु स्वस्त असणारा आणि खूप सारे पोषण तत्त्व असणारे अळीव मात्र लोकांना माहिती नाही. वयस्कर आजी आहेत त्यांनाच याबाबत माहिती असते.

परंतु नवीन पिढीला याबद्दल माहिती नाही. रुग्णाला डायट चार्टमध्ये अळिवाचा उल्लेख करते तेव्हा त्यांना समजून सांगायला खूप अडचणी येतात. मोबाईलवर फोटो दाखवावा लागतो. सगळी माहिती रंग, साईज, फायदे-नुकसान आणि खाण्याची पद्धत सांगावी लागते.

त्यानंतर काही लोकांच्या ही गोष्ट लक्षात येते किंवा काहींनी कधीच पाहिलेलं नसतं. त्यामुळे आजच्या भागात अळिवाविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्याचा वापर आपल्या रोजच्या जीवनामध्ये कसा करता येईल हे बघू..

प्रत्येक जण, विशेषतः स्तन्यपान करणाऱ्या महिला, वयात आलेली मुले, केस गळत असलेले प्रौढ, त्वचा खराब होणे, अलोपेशिया इ. रोग किंवा आजार असलेल्या लोकांनी व महिलांनी अळिवाचे सेवन केलेच पाहिजे.

अळीव लाडूची पाककृती

साहित्य

१ कप अळीव

१ खोवलेला नारळ (मोठा)

अडीच कप खजूर, मनुके सुके अंजीर यांची पेस्ट

२ चमचे तूप

१ चमचे जायफळ विलायची पूड

कृती

नारळाच्या पाण्यात अळीव एक तास भिजवून ठेवा.

भिजवलेल्या अळीव बियांमध्ये किसलेले खोबरे आणि खजूर मनुके सुके अंजिराची पेस्ट मिसळा

अर्ध्या तासानंतर हे मिश्रण कढईत दोन चमचे तूप घालून शिजवून घ्या.

मिश्रण व्यवस्थित शिजेपर्यंत गरम करत राहा.

मिश्रण थंड होऊ द्या आणि त्यात जायफळ विलायची पावडर घाला आणि लाडू वळा हे लाडू वळण्यास अतिशय सोपे असतात थंड झाले तेव्हा वळले तरी चालतात

फ्रिजमध्ये ठेवल्यास १० दिवस चांगले राहते. बाहेर ठेवले तर तीन-चार दिवस टिकतात.

मधुमेह आहे त्यांना हे लाडू नाही चालणार. त्यांनी अळीव भिजून खाल्ला तरी चालेल. लाडूमध्ये गूळ आणि साखरेऐवजी खजूर, मनुके, यांचा वापर केला आहे. कारण त्याचे पोषक मूल्य अधिक असते. त्यामुळे वजन कमी करायचे आहे ते लोकं व्यायामाच्या आधी लाडू खाऊ शकतात.

(लेखिका आहारतज्ज्ञ आहेत.)

(Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com