

Alzheimer Symptoms after 60 | World Alzheimer Day 2026
sakal
Warning Signs of Memory Loss After 60: वय वाढले की विसरभोळेपणा आपोआपच येतो, असे म्हणतात, परंतु एखादी गोष्ट तुमच्या लक्षात आहे आणि तरुणवयातही ती तुम्ही चटकन विसरत असाल, तर तुमची ‘अल्झायमर’ आजाराशी मैत्री होत असल्याचे समजा. पूर्वी हा आजार वयाची ऐंशी ओलांडलेल्या वृद्धांमध्ये आढळून येत होता. अलीकडे साठीजवळ पोहोचलेल्या व्यक्तींमध्ये अल्झायमर (स्मृतिभ्रंश) आजार दिसून येतो. स्मृतिभ्रंश हा स्मृती, विचार, भावना आणि वागणुकीत अडचणी निर्माण करणारा मेंदूचा आजार आहे.