%20-%202024-08-30T104837.970.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Triple-E Mosquito Virus: अमेरिकेतील न्यू हॅम्पशायरमध्ये डासांमुळे पसरणाऱ्या दुर्मिळ विषाणूमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. हा विषाणू अत्यंत दुर्मिळ असून प्राणघातक आहे. अमेरिकेतील न्यू हॅम्पशायर आणि मॅसॅच्युसेट्ससह आसपासच्या राज्यांमध्ये डासांमुळे होणारा ट्रिपल ई विषाणूचा संसर्ग पसरला आहे, असा अमेरिकन प्रशासनाचा विश्वास आहे. या राज्यांना हाय अलर्ट देण्यात आले आहे. या विषाणूचे लक्षण कोणती आहेत आणि हा आजार कसा पसरतो हे सोप्या शब्दात जाणून घेऊया.