आम्हां सांपडले वर्म : संत नामदेव महाराज

संत नामदेवांच्या अभंगातून भागवतधर्माचे वर्म उलगडत; प्रेम, करुणा, समता आणि संतसंगाच्या मार्गाने जीवनाचे खरे ध्येय शोधण्याचा संदेश
Structural Axiology: Defining 'Varma' as the Ultimate Purpose Beyond Materialistic Pursuits

Structural Axiology: Defining 'Varma' as the Ultimate Purpose Beyond Materialistic Pursuits

Sakal

Updated on

सचिन महाराज पवार

आम्हां सांपडले वर्म । करुं भागवतधर्म ॥१॥

संत नामदेव महाराज म्हणतात, की आम्हाला जीवनाचे वर्म सापडले. वर्म म्हणजे गुपित, जीवनाचे सार आणि जगण्याचे खरे प्रयोजन. आजचा माणूस शिक्षण, पैसा, पद आणि प्रतिष्ठा यांचा शोध घेतो; परंतु जीवन का जगायचे, याचे उत्तर अनेकदा त्याच्याकडे नसते. प्रत्येक माणसाला आयुष्याचे ध्येय सापडणे आवश्यक आहे. नामदेव महाराजांना हे ध्येय भागवतधर्मात सापडले. भागवतधर्म हा केवळ धार्मिक आचार नसून प्रेम, करुणा, समता आणि सर्वांना जोडणारा जीवनमार्ग आहे. म्हणूनच हा एका प्रदेशाचा किंवा एका समाजाचा विचार नसून संपूर्ण मानवजातीसाठी असलेले वैश्‍विक अधिष्ठान आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com