फिकट त्वचा आणि ठिसूळ नखे म्हणजे रक्तक्षयाची बाधा

कारण आणि तीव्रतेनुसार रक्तक्षयाच्या शारीरिक लक्षणांमध्ये फरक पडतो.
anaemia
anaemiagoogle

मुंबई : रक्तक्षय हा असा आजार आहे ज्यात प्राणवायू वाहून नेणाऱ्या लाल पेशींचा तुटवडा निर्माण होतो. American Society of Hematology च्या अभ्यासानुसार ३० लाख अमेरिकी नागरिकांना विविध प्रकारच्या रक्तक्षयाची बाधा होते. थकवा हे रक्तक्षयाचे सर्वात सामान्य लक्षण आहे. त्यामुळे आपल्याला रक्तक्षय झाल्याचे रुग्णांना समजणे कठीण होते, असे रक्तक्षयतज्ज्ञ डॉ. अरॉन गुडमॅन यांनी सांगितले.

anaemia
अॅनेमिया म्हणजे काय? कशी आहेत याची लक्षणं आणि कारणं

काही रुग्णांना लक्षणे आढळत नाहीत. थकवा हे सर्वात सामान्य लक्षण आहे मात्र ते इतर कोणत्याही कारणामुळे जाणवू शकते. या आजाराचे निदान होणे कठीण असते. अशावेळी लोहाची कमतरता असलेल्या रुग्णाला लोह पुरवल्यास त्याला बरे वाटते. रक्त तपासणीद्वारेही रक्तक्षयाचे निदान होऊ शकते. कारण आणि तीव्रतेनुसार रक्तक्षयाच्या शारीरिक लक्षणांमध्ये फरक पडतो. त्वचा आणि नखांमध्येही काही वेळा फरक दिसून येतो.

anaemia
अॅनेमिया मुक्त पिंपरी-चिंचवड करू या

त्वचा फिकट पडणे....

लोहाची कमतरता असलेल्या रक्तक्षयाची बाधा झाल्यास त्वचा फिकट दिसू लागते. शरीराच्या काही भागात फिकटपणा अधिक दिसू शकतो. उदा. - डोळ्यांच्या कडा. प्रत्येकवेळी त्वचा फिकट पडण्यामागे रक्तक्षयच कारणीभूत असेल असे नाही. इतरही लक्षणांचा विचार करणे आवश्यक असते.

इतर लक्षणे....

तुम्हाला थंड खाण्याची इच्छा होत असेल तर कदाचित तुम्हाला रक्तक्षयाची बाधा झाली आहे. तसेच अशावेळी भूकेच्या वेळाही बदलतात.

लोहाची कमतरता असल्यास नखे ठिसूळ होऊ शकतात. नखांचा आकार चमच्यासारखा होतो.

बी १२ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळेही रक्तक्षय होतो. यामुळे तोंडाजवळ ओरखडे येतात.

जीभ सुजणे, लाल होणे किंवा गुळगुळीत होणे हीसुद्धा रक्तक्षयाची लक्षणे आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com