Health: अंजीर खाण्याचे अनेक फायदे, मात्र अंजीर खाण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती आहे काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Health

Health: अंजीर खाण्याचे अनेक फायदे, मात्र अंजीर खाण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती आहे काय?

Anjeer Benefits: तुम्ही कायम हेल्दी आणि फिट राहावेत असं तुम्हाला वाटत असेल तर आजच तुमच्या हेल्दी डाएटमध्ये तुम्ही अंजीरचा समावेश करून घ्या. अंजीर वजन कमी करण्याबरोबरच पचनशक्ती सुरळीत करण्यासही मदत करते. कफ आणि ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासही अंजीर फायदेशीर ठरतं. याशिवायही अंजीरचे शरीराला बरेच फायदे आहेत.

अंजीरची झाडं आजूबाजूला घाण पसरवतात असा अनेकांचा गैरसमज असतो. मात्र याच झाडांचे अंजीर शरीरातील घाण बाहेर काढण्यात उपयोगी ठरतात. आयुर्वेदातसुद्धा अंजीराचा समावेश डाएटमध्ये करण्याबाबत सांगितले जाते. मात्र त्यासाठी अंजीर डाएटमध्ये घेण्याचे योग्य प्रकार जाणून घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या मते, अंजीर सकाळी उपाशीपोटी नाशत्याला घेणे सगळ्यात जास्त फायदेकारी ठरतं.

अंजीरची झाडं आजूबाजूला घाण पसरवतात असा अनेकांचा गैरसमज असतो. मात्र याच झाडांचे अंजीर शरीरातील घाण बाहेर काढण्यात उपयोगी ठरतात. आयुर्वेदातसुद्धा अंजीराचा समावेश डाएटमध्ये करण्याबाबत सांगितले जाते. मात्र त्यासाठी अंजीर डाएटमध्ये घेण्याचे योग्य प्रकार जाणून घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या मते, अंजीर सकाळी उपाशीपोटी नाशत्याला घेणे सगळ्यात जास्त फायदेकारी ठरतं.

अंजीर खाण्याची पहिली पद्धत फारच सोपी आहे. त्यासाठी काही ताजी अंजीरची फळे विकत घ्या आणि सामान्य फळांप्रमाणे कापून खाऊन घ्या. तुम्ही सकाळी दोन ते तीन अंजीर खाऊ शकता. अंजीरमध्ये मोठ्या प्रमाणात फायबरचा समावेश असतो. त्यामुळे ही फळे तुम्हाला दीर्घकाळ एनर्जेटिक ठेवतात. तसेच वजन कमी करण्यासही हे मदत करतात. सुक्या अंजीरमध्ये कॅलरी आणि शुगरचं प्रमाण अधिक असतं.

दूधासोबत खाल्ल्यास होईल जास्त फायदा

तुम्ही दूधात एक ते दोन अंजीर उकळवून घ्या. त्यानंतर तयार होणारं दूध हे इम्युनिटी बूस्टर ड्रिंक बनतं. शरीरातील अनेक रोगांवर मात करण्यासाठी हे अंजीरयुक्त दूध फायदेकारी ठरतं. रात्री पिल्यास तुम्हाला उत्तम झोप येण्यासही मदत होईल.

अंजीर मिठाई आहारात घ्या

तुम्ही डेझर्ट प्रेमी असाल तर अंजीर मिठाई कधीही उत्तम ऑप्शन आहे. अंजीरपासून तुम्ही हलवा, पुडिंग, केक,मफिन किंवा बर्फीही बनवू शकता. हे पदार्थ डायबिटीज रोगींसाठीही उत्तम ठरतात. यामुळे वजनही नियंत्रणात राहातं.

ब्रेकफास्ट म्हणूनही उत्तम

तुम्ही जर सिरियल्स किंवा ओट्स खात असाल तर अंजीरचाही त्यात समावेश करून घ्या. बाऊलमध्ये ओट्स किंवा म्यूसलीसह काबी मेवे आणि फळे किंवा अंजीरचा समावेश करा. त्यात भरपूर प्रमाणात पोषक तत्व असतात.

हेही वाचा: Health: मुलांना 'या' सवयींपासून पालकांनी ठेवा दूर, नाहीतर मुलांना हृदयाचे...

लंचमध्ये घ्या अंजीर सॅलेट

तुम्ही तुमच्या सॅलेटमध्ये काही सुखे अंजीर टाकलेत तर पाण्याची मात्रा वाढेल तसेच तुमचं सॅलेट क्रंची होईल. अंजीर सॅलेट लंचमध्ये बेस्ट ऑप्शन आहे.