
डॉ. मालविका तांबे
आत्मसंतुलन व्हिलेजमध्ये सकाळच्या वेळी चालायला गेले असताना पाहिले तर मुंग्यांची मोठी रांग तोंडामध्ये अन्नाचे कण घेऊन निघालेली दिसली. असे वाटले की मे महिन्यातच मुंग्या पावसाळ्यासारखे अन्न घेऊन का चालल्या आहेत? मग लक्षात आहे की निसर्गाने या वर्षी गरमीच्या ऋतूतच वर्षा ऋतूचा प्रारंभ केलेला आहे. निसर्गाच्या नियमांचा मान राखून या मुंग्या मे चालू असला तरी पावसाळ्याच्या दृष्टीने स्वतःचे काम करत आहेत.