मन-निर्मळ : माझ्या आयुष्यातील ‘मी’

दैनंदिन जबाबदाऱ्यांच्या गर्दीत हरवलेल्या ‘मी’चा शोध; वय, परिपूर्णतेचा अट्टहास आणि समाजाच्या अपेक्षा ओलांडत स्वतःसाठी जगण्याचा मनोवैज्ञानिक वेध
"बकेट लिस्ट मागे पडलीये का?" स्वतःला भेटण्यासाठी मॅरॅथॉनची नाही, तर छोट्या पावलांची गरज; वाचा डॉ. सुवर्णा बोबडे यांचा लेख.

"बकेट लिस्ट मागे पडलीये का?" स्वतःला भेटण्यासाठी मॅरॅथॉनची नाही, तर छोट्या पावलांची गरज; वाचा डॉ. सुवर्णा बोबडे यांचा लेख.

Sakal

Updated on

डॉ. सुवर्णा बोबडे, समुपदेशक व मानसशास्त्रज्ञ

आपण सगळे रोजचं आयुष्य जगतो. असंख्य जबाबदाऱ्या पार पाडतो. फावल्या वेळेचा सदुपयोग करायचाही प्रयत्न करतो... पण ‘मी जिवंत आहे’- बोलीभाषेत ‘अलाइव्ह आहे!’ ही भावना किती वेळा जाणवते?...

‘‘डॉक्टर... माझं आयुष्य चुकीचं नाही. पण बरोबरही वाटत नाही!’’ माझ्यासमोर बसलेली ‘ती’ शांत होती. डोळ्यांत पाणी नव्हतं, पण न बोललेला थकवा होता.

‘‘सगळं आहे; पण मी नाहीये त्यात.’’

मी हळूच विचारलं, ‘‘तू शेवटचं स्वतःसाठी काही केलंस ते कधी गं? ज्यात ‘परिणाम’ नव्हता, फक्त करणं होतं?’’

ती थांबली आणि म्हणाली, ‘‘माहीत नाही. खूप वर्षं झाली.’’

आणि मग तीच वाक्यं- ‘आता या वयात कुठे...’, ‘ते दिवस गेले’, ‘ज्या वयात करायचं होतं, तेव्हा नाही करता आलं...’, ‘आता कुठे झेंडे फडकवायचे आहेत?’, ‘सुरू केलं की काही तरी होतंच; मग कशाला परत?’

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com