

how to protect children from waterborne diseases during monsoon rainy season child health tips by pediatrician dr sanjay janawale
Sakal
डॉ. संजय जानवळे, बालरोगतज्ज्ञ
पावसाळा आला, की गॅस्ट्रो, अतिसार, कावीळ, काॅलरा, टायफाॅइड अशा जलजन्य आजाराच्या रुग्णामध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. पावसाच्या नव्या पाण्याबरोबरच साथीच्या रोगांचे थैमान माजते. त्यामुळे हे जलजन्य आजार टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यायला हवी.
अशुद्ध पाणी या विकारांना निमंत्रण देते. पावसाळ्यात हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढलेले असते. थंडीचे प्रमाण सतत कमी-जास्त होत असते. त्याचा परिणाम आपल्या शरीरातील क्रियांवरही होत असतो. आपली पचनशक्ती तसेच रोगप्रतिकारशक्ती मंदावते. पावसाळ्यात अशुद्ध पाण्याबरोबर दूषित अन्नाचे प्रमाणही वाढलेले असते. विशेषत लहान मुलांत अशा सूक्ष्म जंतूंमुळे होणाऱ्या संसर्गजन्य आजारांविरुद्ध लढणारी प्रतिकारशक्ती अविकसित असते. त्यात अशा रोगांपासून मुलांचा बचाव कसा करायचा, याचे पुरेसे ज्ञान पालकांना नसते. त्यामुळेच मोठ्यांच्या तुलनेत लहान मुले संसर्गजन्य रोगाना अधिक बळी पडतात.