

Arogyasathi Sarvottam (Part-3): Ayurvedic Guidance on Diet, Fasting, and Lifestyle by Dr. Malvika Tambe
Sakal
डॉ. मालविका तांबे
मागील भागांमध्ये आपण आरोग्यासाठी सर्वोत्तम ठरणाऱ्या काही गोष्टींची माहिती घेतली. आरोग्य टिकविण्यासाठी आहार आणि आचरणात काही गोष्टींचा समावेश करणे जितके आवश्यक असते, तितकेच काही गोष्टी टाळणेही महत्त्वाचे असते. आयुर्वेदात याविषयी सखोल मार्गदर्शन केले आहे. हितकर गोष्टींचा स्वीकार आणि अहितकर गोष्टींचा त्याग, या दोन्हींच्या समन्वयातून आरोग्याचे संवर्धन होते.