
टिप्स : निरोगी जीवनासाठी...
निरोगी आरोग्यासाठी पौष्टिक अन्नाचा आहारात समावेश करावा.
आहारात कडधान्ये, पालेभाज्या, दूध, फळे यांचा समावेश असावा.
भरपूर पाणी प्यावे.
नियमित वेळेवर जेवण करावे.
आयुर्वेदानुसार तूप हे त्वचेच्या आरोग्यासाठी, तल्लख बुद्धीसाठी उत्तम औषध आहे.
अन्नातील पोषक घटक शरीरात मिसळण्यासाठी तुपाचा उपयोग होतो.
घरी कढवलेले तूप इतर कोणत्याही तेल किंवा बटरपेक्षा पौष्टिक आहे.
डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी पपई हे उत्तम औषध आहे.
पपईचा गर चेहऱ्याला लावला असता त्वचेला चकाकी येते.
पपईमधून शरीराला भरपूर प्रमाणात पोटॅशियम मिळते.
पपईमध्ये कमी कॅलरीज, पण भरपूर पोषण मूल्य असतात, त्यामुळे डाएटवर असलेल्यांनीही पपई खायला हरकत नाही.
नारळामधून शरीराला भरपूर फायबर व प्रोटिन मिळतात.
नारळाचे पाणी हे आजारी माणसासाठी उत्तम टॉनिक आहे.
खोबरेल तेलाचा आहारात रोज समावेश केला असता व्हिटॅमिन ई मिळते.
खोबरेल तेल केसांच्या आरोग्यासाठी पोषक आहे.
डोळ्यांसाठी व्यायाम
अंगठा आणि तर्जनीत भुवया पकडून डोळ्यांच्या सुरवातीपासून शेवटपर्यंत हळू हळू दाबत ४-५ वेळा मसाज करा.
डोळे सावकाश वर खाली, डावीकडे, उजवीकडे फिरवावेत.
दुधात बदाम उगाळून सायीत मिसळून डोळ्यांभोवती हलक्या हाताने मसाज केल्यास रक्ताभिसरण वाढून डोळ्यांचे आरोग्य सुधारते.
सध्या हुरड्याचा हंगाम सुरू आहे. त्याविषयी...
ज्वारीचा हुरडा चवीला मधुर, चविष्ट असून, तो शरीरास गुणकारी असतो.
ज्वारीची हिरवी ताटे उसाप्रमाणे चघळल्यास आरोग्यास पौष्टिक असतात.
ज्वारी पित्तशामक, थंड, मधुर, रक्तविकारनाशी आहे; परंतु ती कफ आणि वायूकारकही आहे.
पांढरी ज्वारी त्रिदोष, मूळव्याध, अरुची, गुल्म, व्रणावर उपयुक्त.
लाल ज्वारी मधुर, शीतल, बलवर्धक, कफहारी, त्रिदोषनाशक आणि पौष्टिक असते.