
Ekadashi health tips: उपवासाला फराळ म्हणून खाल्ल्या जाणाऱ्या भगरीला जर बुरशीचा प्रादुर्भाव झाला असेल तर अन्नविषबाधा होऊ शकते. त्यासाठी शक्यतो नागरिकांनी पाकीटबंद भगर घ्या, ब्रँड नाव नसलेली किंवा लेबल नसलेली भगर पाकिटे व सुटी भगर घेऊ नका, भगर घेताना पाकिटावरची पॅकिंग आणि अंतिम वापर तारीख तपासावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले. तसेच, बुरशीचा प्रादुर्भाव झालेली भगर विक्री करताना आढळल्यास संबंधित विक्रेत्यांविरुद्ध कारवाई होणार, असे निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी यांनी सांगितले.