

Minimally Invasive Spine Surgery: Smaller incisions, less tissue damage and potentially faster recovery for selected patients.
Sakal
डॉ. अजय कोठारी, स्पाइन सर्जन
डॉक्टर, ऑपरेशन करावं लागलं तर मी किती दिवस बेडवर असेन?... मणक्याच्या शस्त्रक्रियेचा विचार करताना अनेक रुग्णांच्या मनात हा प्रश्न असतो. काहींना वाटतं, की स्पाइनची शस्त्रक्रिया म्हणजे महिनोनमहिने विश्रांती, चालणं-बोलणं बंद आणि दैनंदिन आयुष्यापासून दूर राहणं.
हा समज काही वर्षांपूर्वीपर्यंत बऱ्याच अंशी खरा होता; पण आज स्पाइन सर्जरीमध्ये झालेल्या प्रगतीमुळे परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलली आहे. यातीलच एक महत्त्वाची प्रगती म्हणजे एमआयएस अर्थात Minimally Invasive Spine Surgery. या पद्धतीमुळे निवडक रुग्णांमध्ये कमी जखम, कमी स्नायूंची इजा आणि तुलनेने जलद पुनर्वसन शक्य होत आहे.